100 crore recovery case: अनिल देशमुख हेच मुख्य लाभार्थी, वसुलीचा पैसा देशमुखांच्याच खिश्यात जायचा; ED ची रिमांड नोट

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 03, 2021 | 13:33 IST

100 crore recovery case:  राज्याचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना  ईडीने (ED) अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

Anil Deshmukh is the main beneficiary
वसुलीचा पैसा देशमुखांच्याच खिश्यात जायचा,-ED ची रिमांड नोट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सचिन वाझे यांच्यामार्फत वेगवेगळ्या वेळी मुंबई आणि रेस्टॉरंटमधून 4.70 कोटींहून अधिक रक्कम वसूल
  • परकीय षड्यंत्र असण्याची शक्यता
  • अनिल देशमुख होते वाझेंचे नंबर वनचे बॉस

100 crore recovery case: मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना  ईडीने (ED) अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ईडीने न्यायालयाला सांगितलं की, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे या गुन्ह्यातील कमाईचे "मुख्य लाभार्थी" (Main Beneficiary) होते. तसेच देशमुख मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट सहभागी होते, त्यासाठी त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप आहे. अनिल देशमुख या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा म्हणून पुढे आले असल्याचे ED ने आपल्या रिमांड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणात परकीय षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही ईडीने म्हटले आहे.

डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत राज्याचे गृहमंत्री असताना देशमुख यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीने केला आहे. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक (नंतर दुसर्‍या गुन्हेगारी प्रकरणात सेवेतून बडतर्फ) सचिन वाझे यांच्यामार्फत वेगवेगळ्या वेळी मुंबई आणि रेस्टॉरंटमधून 4.70 कोटींहून अधिक रक्कम वसूल केली. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने सोमवारी रात्री उशिरा देशमुख यांना अटक केली. ईडीने देशमुख यांना सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पीबी जाधव यांच्यासमोर हजर केले. तेथून त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.

सचिन वाझेलाही पैसे दिले होते

ईडीच्या रिमांड नोटमध्ये म्हटले आहे की, वाझेला डिसेंबर 2020 मध्ये 40 लाख रुपये आणि जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये 4.30 कोटी रुपये देण्यात आले. ईडीने सांगितले की, 'सचिन वाझेने बारमालक/व्यवस्थापकांना कळवले होते की गोळा केलेले पैसे 'नंबर 1' आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि समाजसेवा शाखेला जातील. अशा प्रकारे सचिन वाझेने विविध बारमालक आणि व्यवस्थापकांकडून 4.70 कोटी रुपये वसूल केले होते. 

अनिल देशमुखांना अटक

ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची 14 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंकडून झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. देशमुखांना 5 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी