कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे १०० कोटी रुपयांची मागणी, ४ जणांना अटक

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 20, 2022 | 07:21 IST

राज्यात नवे सरकार (Maharashtra Politics) स्थापन झाले असून, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे, याचाच फायदा घेत आमदारांना फसवण्याचा प्रयत्न काहींनी केला. राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे. 

100 crore rupees demanded from MLAs to get cabinet minister post
कॅबिनेट मंत्रीपदासाठी आमदारांकडे शंभर कोटींची मागणी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक आमदार आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत
  • गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सापळा रचून एका आरोपीला पकडले.

Mumbai Crime Branch : राज्यात नवे सरकार (Maharashtra Politics) स्थापन झाले असून, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे, याचाच फायदा घेत आमदारांना फसवण्याचा प्रयत्न काहींनी केला. राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे.  भाजपचे आमदार राहुल कुल यांनी यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना माहिती दिली होती. त्याआधारे खंडणीविरोधी पथकाने ओबेरॉय हॉटेलमध्ये कुल आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासमोरच सापळा लावून ही कारवाई केली. 

आमदार राहुल कुल यांच्या स्वीय सचिवाला रियाज शेख असे नाव सांगणाऱ्या तरुणाचा फोन आला. आमदारसाहेबांशी बोलणे झाले असून, खास त्यांच्या कामासाठी दिल्लीहून मुंबईत आलो आहे, असे त्याने सांगितले. स्वीय सचिवांनी हा निरोप कुल यांना दिला. त्यावर चार दिवसांपूर्वी आपणासही या व्यक्तीचा फोन आला होता व मंत्रीपदासाठी १०० कोटी रुपये मागत होता, असे ते म्हणाले. कुल यांनी स्वीय सचिवाला या व्यक्तीला भेटण्यासाठी बोलाविण्यास सांगितले. त्यानुसार १७ जुलैला त्याला ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावण्यात आले.

Read Also : महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डॉली सैनीने मिळवलं सुवर्ण पदक

या दिवशी कुल यांनी रियाजसोबत जवळपास दीड तास चर्चा करून ही रक्कम १००वरून ९० कोटी रुपयांवर आणली. त्यावर २० टक्के म्हणजे १८ कोटी रुपये काम होण्याआधी द्यावे लागतील, अशी अट रियाज याने ठेवली. कुल यांनी ती मान्य करून दुसऱ्या दिवशी पैसे घेण्यासाठी बोलावले. एका बाजूला पैसे देण्याची तयारी दाखवतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली.

तीन आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न 

राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक आमदार आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. परंतु याचा फायदा घेत चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. तसेच मोठ्या मंत्रींनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, सुत्रांच्या माहितीनुसार, हे आरोपी एका बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याचे समजते.

Read Also : रेल्वेने प्रवाशांसाठी सुरू केली नवी स्लीपिंग पॉड्सची सुविधा

मुंबई गुन्हे शाखेची कारवाई, आणखी 3 आरोपींची नावे समोर 

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाली, त्यानंतर गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सापळा रचून एका आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी 3 आरोपींची नावे समोर आली, ज्यांना नंतर अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी