Mumbai Local Train: मुंबईकराच्या कामाला गती येणार, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या होणार

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 26, 2021 | 13:37 IST

Mumbai Local Train good news :मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईची जीवनवाहिनी लोकल परत पूर्ण जोराने धावणार आहे. गुरुवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या होणार आहेत.

100 per cent local trains runs of Central and Western Railways
मुंबईकराच्या कामाला गती येणार, लोकल परत जोराने धावणार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • 18 ऑक्टोबर 2021 रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून एकूण 60 लाख 16 हजार प्रवाशांनी प्रवास केला.
  • वाढत्या गर्दीला लोकल फेऱ्या कमी पडत होत्या. तर, प्रवाशांकडूनही रद्द केलेल्या लोकल सुरू करण्याची मागणी केली जात होती.
  • सध्या मध्य रेल्वेवरून 1 हजार 702 आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 304 लोकलच्या फेऱ्या

Mumbai Local Train good news । मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbaikar) एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईची जीवनवाहिनी लोकल (Mumbai Local) परत पूर्ण जोराने धावणार आहे. गुरुवारपासून मध्य (Central railway) आणि पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) 100 टक्के लोकल फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचा प्रवास आता जलद होणार आहे. किंबहुना त्यांना इच्छितस्थळी इच्छित वेळी पोहोचता येणार आहे. कोरोनानंतर वाढलेल्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (100 per cent local trains runs of Central and Western Railways )

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद नुकतीच करण्यात आली आहे. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या गुरुवारी 28 ऑक्टोबरपासून चालविण्यात येणार आहेत.

राज्य सरकारच्या सूचनेनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास खुला होता. त्यानंतर 15 ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांनाच फक्त मासिक पास देऊन त्यांच्यासाठी लोकल प्रवास खुला केला. दोन्ही डोस घेतलेल्यांचा लोकल प्रवास खुला केल्यानंतर दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढू लागली आहे. 18 ऑक्टोबर 2021 रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून एकूण 60 लाख 16 हजार प्रवाशांनी प्रवास केला.

यामध्ये मध्य रेल्वेवरून एकूण 32 लाख 55 हजार तर, पश्चिम रेल्वेवरून 27 लाख 61 हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे वाढत्या गर्दीला लोकल फेऱ्या कमी पडत होत्या. तर, प्रवाशांकडून रद्द केलेल्या लोकल सुरू करण्याची मागणी केली जात होती. परिणामी, मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने 100 टक्के लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या दरम्यान दरदिवशी मध्य रेल्वेवरून सरासरी 20 लाख 48 हजार प्रवासी आणि याच कालावधीत पश्चिम रेल्वेवरून दरदिवशी सरासरी 16 लाख 39 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. सध्या मध्य रेल्वेवरून 1 हजार 702 आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 304 लोकल फेऱ्या धावत आहेत. असे एकूण 95.70 टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावत आहेत. तर, गुरुवारी, (ता.28) पासून मध्य रेल्वेवरून 1 हजार 774 फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 367 फेऱ्या अशा 100 टक्के फेऱ्या धावणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रवाशांच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी