मुंबई शहरात ७ आणि ८ जून रोजी १०० टक्के पाणीकपात

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 04, 2022 | 14:22 IST

100 percent water cut in mumbai city area on 7 and 8 june 2022 : मुंबई महानगरपालिका एफ दक्षिण विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करणार आहे. यासाठी शिवडी बस डेपोसमोर कमी क्षमतेच्या जलवाहिनीला जास्त क्षमतेची जलवाहिनी जोडण्याचे काम केले जाणार आहे.

100 percent water cut in mumbai city area on 7 and 8 june 2022
मुंबई शहरात ७ आणि ८ जून रोजी १०० टक्के पाणीकपात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबई शहरात ७ आणि ८ जून रोजी १०० टक्के पाणीकपात
  • जलवाहिनी जोडण्याचे काम
  • पाणी जपून वापरा

100 percent water cut in mumbai city area on 7 and 8 june 2022 : मुंबई : मुंबई महानगरपालिका एफ दक्षिण विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करणार आहे. यासाठी शिवडी बस डेपोसमोर कमी क्षमतेच्या जलवाहिनीला जास्त क्षमतेची जलवाहिनी जोडण्याचे काम केले जाणार आहे. या कामामुळे मंगळवार ७ जून २०२२ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बुधवार ८ जून २०२२ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत २४ तासांकरिता पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबई शहर उत्तर व दक्षिण परिसर येथील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

अद्याप मान्सूनचे मुंबईत आगमन झालेले नाही. उन्हाचा त्रास जाणवत आहे. या परिस्थितीत अत्यावश्यक काम म्हणून ७ आणि ८ जून रोजी पाणी पुरवठा काही भागांमधये बंद तर काही भागांमध्ये कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई मनपाने केले आहे. नागरिकांच्या दीर्घकालीन सोयीसाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. यामुळे ७ आणि ८ जून रोजी नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन मुंबई मनपाने केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी