मुलांनो, अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई
Updated Oct 15, 2019 | 23:55 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परिक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी- बारावीच्या परीक्षा होतील.

Representative Image
मुलांनो, अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परिक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.
  • दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे तर 12 वीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
  • मंडळानं आज दहावी- बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्यमंडळाच्या वेबसाईटवर जाहीर केलं आहे. 

पुणेः  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परिक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे तर 12 वीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू होईल. मंडळानं आज दहावी- बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्यमंडळाच्या वेबसाईटवर जाहीर केलं आहे. 

दहावीची परीक्षा 3 मार्च ते 22 मार्च 2019 या दरम्यान होईल. 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान होणार आहे. राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी- बारावीच्या परीक्षा होतील. एकाचवेळी उच्च माध्यमाकि प्रमाणापत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणापत्र म्हणजेच दहावीची लेखी परीक्षा होईल. 

या दोन्ही परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या  दहावी आणि बारावी परिक्षांचं वेळापत्रक  http://www.mahahsscboard.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. 

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल. लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सुचना, हरकती असल्यास संबंधित विभागीय मंडळांकडे तसंच राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात.

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचं व्यवस्थित नियोजन करणं सोपं जावं आणि त्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं हे वेळापत्रक 4 महिन्या आधीच जाहीर केलं असल्यांचही मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. हे संभाव्य वेळापत्रक असणार आहे. छापील स्वरूपतील अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना नंतर देण्यात येणार असल्याचंही पुढे स्पष्ट केलं गेलं आहे. याव्यतिरिक्त अन्य काही वेबसाईट्स, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल माध्यमांतून प्रसिद्ध किंवा व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असं आवाहनही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांच्याकडून करण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...