10th class exam starts from today, more than 15 lakh 77 thousand students will give the exam : महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना आज म्हणजेच गुरुवार 2 मार्च 2023 पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमध्ये इयत्ता 10 वी साठी 5 हजार 33 केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 23 हजार 10 माध्यमिक शाळांमधून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8 लाख लाख 44 हजार 116 विद्यार्थी आणि 7 लाख 33 हजार 67 विद्यार्थिनी आहेत.
विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात एकाग्रतेने परीक्षा द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. केसरकर यांनी परीक्षा देणार असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने मार्च 2023 च्या माध्यमिक शालान्त (इ. 10वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे.
परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानिक अस्तात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदरसाठी राज्य स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या शंकांचे निरमर करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ आणि 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता आणि उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (स्तर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात 10.30 वाजता आणि दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून सकाळच्या सत्रात सकाळी 11.00 तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 3.00 वाजवा परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?
चाणक्य निती : पत्नी पतीपासून या गोष्टी लपवून ठेवते
घरातल्या झुरळांचा बंदोबस्त करण्याचे सोपे प्रभावी उपाय
परीक्षा निकोप, भयमुक्त आणि फॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. तथापि पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.