आमदारांपाठोपाठ हे ११ खासदार उद्धव ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात होणार सामील?

11 MP Will join Shinde group by pushing Uddhav Thackeray? : मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या गटात ११ शिवसेनेचे खासदार सहभागी होणार आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार आहेत त्यापैकी ११ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

11 MP Will join  Shinde group by pushing  Uddhav Thackeray?
'हे' ११ खासदार ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात होणार सामील?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात शिवसेनेचे १८ खासदार आहेत त्यापैकी ११ खासदार शिंदे गटात सामील होणार ?
  • शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र चर्चेत
  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवाराला मतदान करावे शेवाळे यांनी केली मागणी

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत अनेक आमदारांना आपल्याकडे वळवून घेतले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेले हे बंड यशस्वी झाले आहे असचं म्हणावे लागेल. कारण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांना राज्याचे मुख्यमंत्री पद मिळाले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक आमदार तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर त्यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या गटात ११ शिवसेनेचे खासदार सहभागी होणार आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार आहेत त्यापैकी ११ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : CCTV: आईसोबत गेलेल्या मुलाच्या अंगावर लोखंडी मशीन कोसळली

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र चर्चेत

दरम्यान, मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे ते पत्र सध्या मोठ्या चर्चेत आहे. राहुल शेवाळे यांनी ठाकरे यांना पत्र लिहित म्हटलं आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवाराला मतदान करावे अशी मागणी शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. मात्र, शिवसेनेकडून सध्या विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : तर मातोश्रीवर परत जाऊ बंडखोर आमदार संजय राठोडांच वक्तव्य 

शिंदे गटात हे खासदार होऊ शकतात सामील?

१ ) श्रीकांत शिंद (कल्याण)

२ ) कृपाल तुमाने (रामकेट )

३ ) हेमंत पाटील (हिंगोली)

४ ) सदशिव लोखंडे (शिर्डी)

५ ) भावना गवळी (यवतमाळ)

६ ) राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई)

७ ) प्रतापराव जाधव (बुलढाणा)

८ ) राजेंद्र गावित (पालघर) 

९ ) हेमंत गोडसे (नाशिक)

१० ) श्रीरंग बारणे (मावळ)

११ ) राजन विचारे (ठाणे)

अधिक वाचा : बादशाहचं नवं गाणं रिलीज, काही तासातच इंटरनेटवर तुफान Viral

हे खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार?

१ ) विनायक राऊत (रत्नागिरी)

२ ) ओमराजे निंबाळकर ( उस्मानाबाद)

३ ) धैर्यशील माने (हातकणंगले)

४ ) गजानन किर्तीकर (उत्तर-पश्चिम मुंबई)

५ ) संजय बंदू जाधव (परभणी)

६ )  संजय मंडलिक (कोल्हापुर)

७ ) अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)

८ ) कला बेन डेलकर दादरा नगर हवेली

 अधिक वाचा : नाशकात अफगाणी तरुणाची हत्या, समोर आलं धक्कादायक वास्तव,

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी