राज्याला मोठा दिलासा देणारी बातमी

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत

1408 patients discharge in a one day after treatment covid19 maharashtra
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • बरे झालेल्यांची संख्या विक्रमी
  • एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

मुंबई: राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना आता राज्याला एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण, राज्यात आज एकाच दिवशी १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

२.५० लाखांहून अधिक जणांचे नमुने निगेटिव्ह 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील सध्याची स्थिती 

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे.आज २३४५ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १४०८ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज ६४ जणांचा मृत्यू

राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १४५४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद  शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात १  मृत्यू झाले आहेत. 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६ पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये (५९ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी