वाघाच्या हल्ल्यात महिला वन रक्षकाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 21, 2021 | 17:38 IST

15 lakh assistance to the family of forest ranger Dhumne who died in a tiger attack ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे.

15 lakh assistance to the family of forest ranger Dhumne who died in a tiger attack
वाघाच्या हल्ल्यात महिला वन रक्षकाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा 
थोडं पण कामाचं
  • वाघाच्या हल्ल्यात महिला वन रक्षकाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
  • वन रक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल
  • वन रक्षक स्वाती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्यात येईल

15 lakh assistance to the family of forest ranger Dhumne who died in a tiger attack मुंबईः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत स्वाती ढुमणे यांच्या प्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत  घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे.  वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी