Water Cut in Mumbai मुंबईकरांनो पाणी वापरा जपून; १५ टक्के पाणी कपात, तर या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईत जरी मुसळधार पाऊस पडत असला तरी मुंबईकरांनी सध्या पाणी जपूनच वापरावे. कारण मुंबई महानगर पालिकेने पाणीकपात जाहीर केली आहे. इतकेच नाही तर मुंबईतील काही ठिकाणी पाणीपुरवठाही बंद ठेवला जाणार आहे.

water cut in mumbai
पाणी कपात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत जरी मुसळधार पाऊस पडत असला तरी मुंबईकरांनी सध्या पाणी जपूनच वापरावे.
  • कारण मुंबई महानगर पालिकेने पाणीकपात जाहीर केली आहे.
  • इतकेच नाही तर मुंबईतील काही ठिकाणी पाणीपुरवठाही बंद ठेवला जाणार आहे.

Mumbai Water Cut : मुंबई : मुंबईत जरी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असला तरी मुंबईकरांनी सध्या पाणी जपूनच वापरावे. कारण मुंबई महानगर पालिकेने (BMC) पाणीकपात (Water Cut) जाहीर केली आहे. इतकेच नाही तर मुंबईतील काही ठिकाणी पाणीपुरवठाही बंद (No Water supply ) ठेवला जाणार आहे. 

अधिक वाचा : तब्बल १७ वर्षांनी पत्नी सोडून गेलेल्या दिवशीच पतीने घेतला गळफास, मृत्यूपूर्वी केलं 'असं काही'

उद्या गुरूवारी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महानगर पालिकेने पाणीकपात जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार जलवाहिनी छेद जोडणी आणि झडपा बदलण्याच्या कामांमुळे गुरूवारी ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपुर्ण मुंबई शहर आणि उपनगरांत १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तसेच काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भांडुप संकुल येथील जुन्या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे व बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्लोरिन इंजेक्शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यास्तव, सदर कालावधीत संपूर्ण मुंबई शहर व दोन्ही उपनगरात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. 

अधिक वाचा :  CNG Price Hike : मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ, सर्वसामान्यांवर वाढणार महागाईचा बोझा

त्यामुमुळे मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात जारी करण्यात आली आहे. काही भागात पाणीपुरवठा बंद रहाणार आहे.  भांडूपच्या सर्वोदय नगर येथील गावदेवी भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 

अधिक वाचा : Uday Samant Car Attack:उदय सामंत गाडी हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड, शहर प्रमुखासह 5 जणांना अटक​

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी