17 omicron cases found in maharashtra मुंबईः महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनची बाधा झालेले १७ रुग्ण आढळले. यापैकी सहा जण बरे झाले तर ११ जणांवर उपचार सुरू आहेत. आज (शुक्रवार १० डिसेंबर २०२१) ओमायक्रॉनची बाधा झालेले तीन रुग्ण मुंबईत तर चार रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळले. यामुळे सध्या मुंबईत उपचार घेत असलेल्या ओमायक्रॉनबाधितांची संख्या दोनवरुन पाचवर पोहोचली तर पिंपरी चिंचवडमधील ओमायक्रॉनबाधितांची संख्या दोनवरुन सहावर पोहोचली.
मुंबईत आज आढळलेल्या चार ओमायक्रॉनबाधितांपैकी पहिला रुग्ण ४८ वर्षांचा असून टांझानियातून आला आहे. दुसरा रुग्ण २५ वर्षांचा असून लंडनमधून आला आहे. पहिल्या रुग्णाचे लसीकरण पूर्ण झालेले नाही तर दुसऱ्याचे लसीकरण झाले होते. तिसरा रुग्ण ३७ वर्षांचा असून मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आली आहे. याचे लसीकरण झाले आहे.
आज मुंबईत आढळलेले ३ रुग्ण हे ४८, २५ आणि ३७ वर्षांचे पुरुष असून त्यांनी अनुक्रमे टांझानिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका-नैरोबी या देशांमध्ये प्रवास केलेला आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये आढललेले ४ ही रुग्ण हे नायजेरियावरुन आलेल्या ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या महिलेचे येथील नातेवाईक आहेत.
आज आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला आहे तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. एका रुग्णाचे वय साडे तीन वर्षे असल्याने लसीकर्ण झालेले नाही. ४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर ३ रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.