Unseasonal Rain : जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात विक्रमी अवकाळी पाऊस, रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका

Unseasonal Rain Maharashtra जानेवारी महिन्यात राज्यात विक्रमी अवकाळी पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात सरासरीपेक्षा १७० टक्के पाऊस झाला आहे. तर देशात सरासरीपेक्षा १९० टक्के पाऊस झाला आहे.

थोडं पण कामाचं
  • जानेवारी महिन्यात राज्यात विक्रमी अवकाळी पाऊस पडला आहे.
  • रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
  • राज्यात सरासरीपेक्षा १७० टक्के पाऊस झाला आहे.

Unseasonal Rain Maharashtra : मुंबई : जानेवारी महिन्यात राज्यात विक्रमी अवकाळी पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात सरासरीपेक्षा १७० टक्के पाऊस झाला आहे. तर देशात सरासरीपेक्षा १९० टक्के पाऊस झाला आहे. 

मान्सून संपल्यानंतरही २०२१ च्या नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाच्या सरी राज्यात कोसळतच आहे. देशात दरवर्षी जानेवारी महिन्यात ११.३० टक्के सरासरी पाऊस पडतो. परंतु २०२२ च्या जानेवारीतील २३ दिवसांत ३२.८ टक्के इतके पाऊस पडला आहे. जानेवारी महिना संपायला आणखी एक आठवडा शिल्लक आहे, तसेच हवामान विभागाने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ही सरासरी आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका

रायगड - ३२५६ टक्के , रत्नागिरी - १२३६ टक्के, गडचिरोली - ८४० टक्के, चंद्रपूर - ६७४ टक्के, सिंधुदुर्ग - २४० टक्के, धुळे - ४४३ टक्के, अमरावती - २०८ टक्के, यवतमाळ - २२१ टक्के, नागपूर - ३११ टक्के, वर्धा - ३२१ टक्के, गोंदिया - ८३ टक्के, पुणे ८२ टक्के, नंदुरबार ९४ टक्के.

१८ राज्यात पाऊस नाही

राज्यात अवकाळी पाऊस असताना १८ राज्यात पाऊस पडला नाही. तर एका राज्यात साधारण पाऊस पडला. ४ राज्यात कमी पाऊस तर ४ राज्यात खूप कमी पाऊस पडला. २ राज्यात मुसळधार पाऊस पडला तर ८ राज्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे., 

या राज्यात अतिवृष्टी

गेल्या २३ दिवसांत झारखंडमध्ये १२९ टक्के पासू पडला, तर मणिपूरमध्ये ९५ टक्के पाऊस पडला आहे. उत्तराखंडमध्ये २४७ टक्के, हरियाणात ६३६ टक्के पाऊस, दिल्लीत ६८५ टक्के पाऊस, पंजाबमध्ये ६८९ टक्के, छत्तीसगडमध्ये ५३७ टक्के, गुजरात २२९ टक्के, मध्य प्रदेश २९३ टक्के, ओडिशात ३७१ टक्के, आंध्र प्रदेशात २०९ टक्के, तेलंगाणात  ४६१ टक्के, तमिळनाडू १३४ टक्के तर माहराष्ट्रात १७० टक्के पाऊस पडला आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी