177 crores compensation will be given to those affected by the unseasonal rains of March 2023 in Maharashtra : महाराष्ट्रात मार्च 2023 मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. या घटनेची दखल घेऊन भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार निधी वितरणाचा शासन निर्णय काढण्यात आला.
राज्यात 4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने झालेले नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मादविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.
महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी असा: अमरावती विभाग 24 कोटी 57 लाख 95 हजार, नाशिक विभाग 63 कोटी 9 लाख 77 हजार, पुणे विभाग 5 कोटी 37 लाख 70 हजार, छत्रपती संभाजी नगर 84 कोटी 75 लाख 19 हजार. एकूण निधी- 177 कोटी 80 लाख 61 हजार
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.