18 lakh maharashtra government employees on indefinite strike, stop work, indefinite band in maharashtra : जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी करत महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्र शासनाचे 18 लाख कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर जात आहेत. राज्य सरकार जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत संप करू असे कर्मचारी संघटनांनी जाहीर केले आहे. कर्मचारी संघटनांनी सोमवारच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू होत असल्याची घोषणा केली आहे. संपात शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगरपालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसीलदार कार्यालये येथे कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत.
राज्य सरकारी - निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन संपाची घोषणा केली. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. मंगळवारी आझाद मैदान येथे मोर्चा काढून ते आपला संप जाहीर करणार असल्याचे समितीचे निमंत्रक काटकर यांनी सांगितले.
मंत्रालय आणि इतर सरकारी कार्यालयांतील कर्मचारी बेमुदत संपाला पाठींबा देत आहेत. शिवाय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या प्रमुखांचा सुद्धा पाठिंबा या संपाला आहे. त्यामुळे उपहारगृहांवर अवलंबून राहणाऱ्यांच्या जेवणाचे मोठे हाल होणार आहेत; असे काटकर म्हणाले.
महाराष्ट्राच्या विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन 24 मार्च 2023 पर्यंत आहे. अधिवेशनाच्या कामात मोठ्या संख्येने सरकारी अधिकारी आणि कर्मचारी गुंतले आहेत. संपाला या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळाला तर सरकारी कामकाज पुरते कोलमडणार आहे. यामुळे संप सुरू झाल्यावर काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
महाराष्ट्रात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. संपामुळे परीक्षेवर परिणाम होणार की नाही याबाबत संभ्रम आहे.
संघटनेचे अठरा लाख कर्मचारी कामावर म्हणजे कार्यालयात येणार नाहीत. जेव्हा संघटनेकडून आदेश दिले जातील तेव्हा कर्मचारी निर्दर्शने, सभा यात सहभागी होणार आहेत. जिल्हा स्तरावर काळ्या फिती लावून संप केला जाईल.
या ब्रँडची मूळ नावं माहिती आहेत का?
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.