मुंबईची चिंता वाढली, कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजारांच्या जवळ

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 15, 2020 | 21:27 IST

आज कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 1936 झाली आहे. यापैकी 181 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे.

coronavirus positive cases in Mumbai
मुंबईची चिंता वाढली,कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजारांच्या जवळ  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही 2 हजारांच्या जवळ जाऊन पोहचली आहे.
  • आज कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
  • कोरोनाग्रस्तांची संख्या 1936 झाली आहे. यापैकी 181 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईः मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही 2 हजारांच्या जवळ जाऊन पोहचली आहे. आज कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 1936 झाली आहे. यापैकी 181 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे.

तर आतापर्यंत मुंबईत 113 जणांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनाची लागण झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून त्याचाच हा परिणाम असल्याचे दिसत आहे. या दोन मृतांपैकी एका रुग्णाला दीर्घकालीन आजार होते तर दुसरी व्यक्ती वयोवृद्ध होती. मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज 17 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

राज्याचा आकडाही वाढला 

गेल्या अवघ्या 12 तासात राज्यात 117 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील रुग्णांचा आकडा हा 2801 एवढा झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे आतापर्यंत महाराष्ट्रात आढळून आले आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सकाळपासून 117 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 66 रुग्ण हे मुंबईत तर 44 रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत. तर इतर ठिकाणी 7 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत 352 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर 11 जणांचा मृत्यू झाला होता. 

मुंबईतल्या 9 हॉटस्पॉटवर जास्त कोरोनाबाधित 

मुंबईतील काही भागांना मुंबई महापालिकेने हॉटस्पॉट म्हणून घोषित केलं आहे. मात्र यापैकी अवघ्या 9 हॉटस्पॉटमध्येच हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण असल्याचे आढळून आलं आहे.  यात वरळी, भायखळा, वांद्रे पूर्व, अंधेरी, कुर्ला, नाना चौक, धारावी आणि गोवंडीचा समावेश आहे. या नऊ वॉर्डात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्याने मुंबईतील हे 9 वॉर्ड हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. औषधांची फवारणी, तपासण्या, इमारतीचं सॅनिटायझेशन आणि कंटेनमेंट झोनची निर्मिती आदी गोष्टी करण्यात आल्या असून या भागातील अनेक लोकांना होम क्वॉरंटाइनही करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी