Gangrape in Mumbai : मुंबईत १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, चार आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन

मुंबईत एका १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केला आहे. आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. सुरूवातीला पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली, चौथ्या आरोपीला पोलिसांनी पनवेलहून अटक केली आहे.

थोडं पण कामाचं
  • मुंबईत एका १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केला आहे.
  • आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.
  • चौथ्या आरोपीला पोलिसांनी पनवेलहून अटक केली आहे.

Gangrape in Mumbai : मुंबई : मुंबईत एका १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केला आहे. आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. सुरूवातीला पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली, चौथ्या आरोपीला पोलिसांनी पनवेलहून अटक केली आहे. (19 year old girl gangrape in mumbai four accused arrested by police)

पहाटेच्या वेळी बलात्कार

गोवंडीत एक १९ वर्षाची तरुणी कॅटर्समध्ये कामाला होती. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ती घरी येत होती. तेव्हा या चार आरोपींनी तिला रस्त्यात गाठले. तेव्हा एका आरोपीने तिला काहीतरी सांगण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले. तेव्हा त्याचे साथीदारही त्यांच्या पाठोपाठ आले. नंतर चौघांनी आळीपाळीने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तरुणीने आरडा ओरड करून मदत मागण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी तिचे तोंड दाबून धरले होते. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला. पीडित तरुणीने तत्काळ पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित तरुणीला रजावाडी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय चाचणीत तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पण्ण झाले. 
 

आरोपींना अटक

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी चार अरोपींपैकी तीन आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले. तर चौथा आरोपी पनवेलला पळाला होता. चौथा आरोपी  आपल्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी लपला होता आणि इतर ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत होता. या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १० वेगवेगळी पथके स्थापन केली होती. या पथकाने अनेक ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. अखेर पनवेलमध्ये हा आरोपी सापडला असून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. तसेच दोन आरोपींना डोंगरीच्या सुधारगृहात पाठवले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी