Measles In Mumbai : मुंबईत 2 दिवसांत 2 गोवरबाधीत बाळांचा मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 22, 2023 | 09:00 IST

2 babies died due to measles in 2 days in Mumbai : मुंबईत 2 दिवसांत 2 गोवरबाधीत बाळांचा मृत्यू झाला.

Measles
मुंबईत 2 दिवसांत 2 गोवरबाधीत बाळांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत 2 दिवसांत 2 गोवरबाधीत बाळांचा मृत्यू
  • नऊ महिन्यांच्या बाळाचा पालिका रुग्णालयात गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी मृत्यू
  • ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुलीचा शुक्रवार 20 जानेवारी 2023 रोजी मृत्यू

2 babies died due to measles in 2 days in Mumbai : मुंबईत 2 दिवसांत 2 गोवरबाधीत बाळांचा मृत्यू झाला. अॅण्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या एका नऊ महिन्यांच्या बाळाचा पालिका रुग्णालयात गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी मृत्यू झाला. तर ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुलीचा शुक्रवार 20 जानेवारी 2023 रोजी मृत्यू झाला. दोन्ही बाळांना गोवर हा आजार झाला होता. बाळांच्या मृत्यूचे नेमके कारण सविस्तर वैद्यकीय अहवाल आल्यानंतर समजेल. पण गोवरची बाधा झालेल्या 2 बाळांचा मृत्यू झाल्यामुळे मुंबईत लहानग्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गुरुवारी मृत्यू झालेल्या बाळास 11 जानेवारी रोजी ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ लागला होता. दोन दिवसांनंतर त्याच्या शरीरावर पुरळ आले. त्याची श्वसनक्रियाही अनियमित झाली. या बाळाच्या पालकांनी त्याला तीन दिवसांनंतर पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. श्वसनक्रिया निकामी झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. मात्र त्याची प्रकृती खालावत गेल्याने गुरुवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.

ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुलीला 9 जानेवारी रोजी ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ लागला. 11 जानेवारी रोजी तिच्या शरीरावर पुरळ आले. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पालकांनी 12 जानेवारी रोजी पालिका रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. तिची श्वसनक्रिया निकामी झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आवश्यक ते सर्व उपचार करूनही मुलीची प्रकृती खालावत गेली. शुक्रवार 20 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता तिचा मृत्यू झाला. या मुलीला लस दिली नव्हती.

गोवर म्हणजे काय? 

गोवर या संसर्गजन्य आजाराला रुबेला असेही म्हणतात. हा एक विषाणूजन्य आजार आहे जो लहान मुलांसाठी गंभीर ठरू शकतो. पण गोवर प्रतिबंधात्मक लस घेतल्यास मुलांना या आजारापासून संरक्षण मिळू शकते. 

गोवरची लक्षणे

ताप येणे, अशक्त वाटणे, सर्दी-खोकला, वाहणारे नाक, क्रॅक नखे, शरीरावर पुरळ येणे, घसा खवखवणे, हातपाय दुखणे, सतत थकवा येणे

गोवरवर उपचार

गोवर झाल्यास स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र अंथरुण-पांघरुण वापरा. आजारी व्यक्तीचे कपडे तसेच अंथरुण पांघरुण गरम पाण्यात डेटॉल मिसळून त्यात भिजवावे आणि धुवून घ्यावे. आजारी व्यक्तीने खोकताना आणि शिंकताना रुमाल वापरावा. गर्दीत जाणे टाळावे. कोणाशीही भेटताना बोलताना सुरक्षित अंतर राखावे आणि मास्क वापरावे.  डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करुन घ्यावे तसेच गोवर प्रतिबंधात्मक लस घ्यावी. डॉक्टरांनी सांगितलेल्या डाएटचे पालन करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन ए च्या गोळ्या घ्याव्या.

गोवर प्रतिबंधात्मक लस

गरोदर महिला, बाळंतपण झालेल्या महिला यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोवर, गालगुंड, रुबेला (MMR - Measles, Mumps and Rubella) लस घ्यावी. लहानग्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने गोवर, गालगुंड, रुबेला (MMR) लस द्यावी. काही वेळा डॉक्टर एमएमआर ऐवजी गोवर, गालगुंड, रुबेला, चिकनपॉक्स अर्थात व्हॅरिसेला यासाठीची एमएमआरव्ही (MMRV) ही लस घेण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती लस घ्यावी. गोवर रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि लहान मुलांना गोवर विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर तीन दिवसांच्या आत गोवरची लस दिली जाऊ शकते.

IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने सीरिजही जिंकली

Chandrashekhar Bawankule यांचं Pankaja Munde यांच्याबाबत मोठं विधान

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी