fire breaks out at Hansa Heritage मुंबईत 'हंसा हेरिटेज'ला आग, दोघांचा मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 07, 2021 | 09:41 IST

2 die as fire breaks out at Hansa Heritage building in Mumbai मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली येथे असलेल्या हंसा हेरिटेज या इमारतीच्या चौदाव्या मजल्याला आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आहे.

2 die as fire breaks out at Hansa Heritage building in Mumbai
मुंबईत 'हंसा हेरिटेज'ला आग, दोघांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुंबईत 'हंसा हेरिटेज'ला आग, दोघांचा मृत्यू
  • इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शनिवारी (६ नोव्हेंबर २०२१) रात्री साडेआठ वाजता आग लागली
  • 'लेव्हल वन' आग, सात बंबगाड्यांनी अथक प्रयत्नांनी आग विझवली

2 die as fire breaks out at Hansa Heritage building in Mumbai । मुंबईः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली येथे असलेल्या हंसा हेरिटेज या इमारतीच्या चौदाव्या मजल्याला आग लागली. शनिवारी (६ नोव्हेंबर २०२१) रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आहे. इमारतीमध्ये त्यावेळी असलेले इतर नागरिक सुरक्षित आहेत.

कांदिवलीच्या मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज ही तळमजला अधिक पंधरा मजले अशी इमारत आहे. या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शनिवारी (६ नोव्हेंबर २०२१) रात्री साडेआठ वाजता आग लागली. ही 'लेव्हल वन' आग होती. अग्नीशमन दलाच्या सात बंबगाड्यांनी अथक प्रयत्नांनी आग विझवली. आग प्रकरणाची चौकशी होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी