महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 122 वरुन 124 वर, प्रभादेवी- ठाण्यात नवे रुग्ण

मुंबई
Updated Mar 26, 2020 | 11:19 IST

राज्यात लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या थांबताना दिसत नाही. आज पुन्हा मुंबई आणि ठाण्यात दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता  महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे.

Corona virus update in state
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 122 वरुन 124 वर   |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: राज्यात लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या थांबताना दिसत नाही. आज पुन्हा मुंबई आणि ठाण्यात दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता  महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर गेली होती.

मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून त्यांची केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे. दुसरा रुग्ण हा ठाण्यात सापडला आहे. 

बुधवारी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 2 पुरुष, 2 स्त्रिया आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.  त्यामुळे सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. दुसरीकडे मुंबईत देखील बुधवारी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 • मुंबई – 51
 • पुणे – 19
 • पिंपरी चिंचवड – 12
 • सांगली – 9
 • कल्याण – 5
 • नवी मुंबई – 5
 • नागपूर – 4
 • यवतमाळ – 4
 • अहमदनगर – 3
 • ठाणे – 5
 • सातारा – 2
 • पनवेल – 1
 • उल्हासनगर – 1
 • वसई विरार – 1
 • औरंगाबाद – 1
 • रत्नागिरी – 1

एकूण 124


महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

 • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त
 • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
 • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
 • नागपूर (1) – 12 मार्च
 • पुणे (1) – 12 मार्च
 • पुणे (3) – 12 मार्च
 • ठाणे (1) – 12 मार्च
 • मुंबई (1) – 12 मार्च
 • नागपूर (2) – 13 मार्च
 • पुणे (1) – 13 मार्च
 • अहमदनगर (1) – 13 मार्च
 • मुंबई (1) – 13 मार्च
 • नागपूर (1) – 14 मार्च
 • यवतमाळ (2) – 14 मार्च
 • मुंबई (1) – 14 मार्च
 • वाशी (1) – 14 मार्च
 • पनवेल (1) – 14 मार्च
 • कल्याण (1) – 14 मार्च
 • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
 • औरंगाबाद (1) – 15 मार्च
 • पुणे (1) – 15 मार्च
 • मुंबई (3) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • यवतमाळ (1) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • मुंबई (1) – 17 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
 • पुणे (1) – 18 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
 • मुंबई (1) – 18 मार्च
 • रत्नागिरी (1) – 18 मार्च
 • मुंबई (1) – 19 मार्च
 • उल्हासनगर (1) – 19 मार्च
 • अहमदनगर (1) – 19 मार्च
 • मुंबई (2) – 20 मार्च
 • पुणे (1) – 20 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
 • पुणे (2) – 21 मार्च
 • मुंबई (8) – 21 मार्च
 • यवतमाळ (1) – 21 मार्च
 • कल्याण (1) – 21 मार्च
 • मुंबई (6) – 22 मार्च
 • पुणे (4) – 22 मार्च
 • मुंबई (14) – 23 मार्च
 • पुणे (1) – 23 मार्च
 • मुंबई (1) – 23 मार्च
 • कल्याण (1) – 23 मार्च
 • ठाणे (1) – 23 मार्च
 • सातारा (2) – 23 मार्च
 • सांगली (4) – 23 मार्च
 • पुणे (3) – 24 मार्च
 • अहमदनगर (1) – 24 मार्च
 • सांगली (5) – 25 मार्च
 • मुंबई (9) – 25 मार्च
 • ठाणे (1) – 25 मार्च
 • मुंबई (1) – 26 मार्च
 • ठाणे (1) – 26 मार्च
 • एकूण – 124 कोरोनाबाधित रुग्ण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...