..तर राज ठाकरेंना होणार अटक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 06, 2022 | 18:01 IST

Beed Court Issue Arrest Warrant Against MNS Chief Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात नव्याने अटक वॉरंट निघाले आहे. या वॉरंटची अंमलबजावणी झाल्यास राज ठाकरे यांना पुन्हा अटक होऊ शकते.

2008 Case Of Stone Pelting on MSRTC BUS In Beed Court Issue Arrest Warrant Against MNS Chief Raj Thackeray
..तर राज ठाकरेंना होणार अटक 
थोडं पण कामाचं
  • ..तर राज ठाकरेंना होणार अटक
  • अटक वॉरंट २००८च्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील कोर्टाने काढले
  • राज ठाकरेंनी दिलेल्या चिथावणीनंतर एसटीच्या बसवर दगडफेक झाल्याचा आरोप

2008 Case Of Stone Pelting on MSRTC BUS In Beed Court Issue Arrest Warrant Against MNS Chief Raj Thackeray : मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात नव्याने अटक वॉरंट निघाले आहे. या वॉरंटची अंमलबजावणी झाल्यास राज ठाकरे यांना पुन्हा अटक होऊ शकते. अटक वॉरंट २००८च्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील कोर्टाने काढले आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी २००८ मध्ये बीड जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात कोर्टात सुरू असलेल्या केसमध्ये सातत्याने नव्या तारखा पडत होत्या. राज ठाकरे यांच्या चिथावणीनंतर दगडफेक झाली असा आरोप ठेवून केसमध्ये मनसेच्या प्रमुखांना आरोपी करण्यात आले आहे. राज ठाकरे कोर्टात सातत्याने गैरहजर होते. अखेर कोर्टाने राज यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. 

याआधी सहा वर्षांपूर्वी दुष्काळी भागाचा दौरा करण्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी अंबाजोगाईच्या कोर्टात ३०० रुपयांचा दंड भरुन त्यांच्या विरोधात निघालेले एक वॉरंट रद्द करुन घेतले होते. आता पुन्हा एकदा कोर्टातून राज यांच्या विरोधात वॉरंट निघाले आहे.

रेल्वेमध्ये परप्रांतियांची भरती सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यानंतर मनसेने ठिकठिकाणी आंदोलन केले. यातल्याच एका आंदोलनावेळी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी एसटीच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाशी संबंधित केसची सुनावणी कोर्टात सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी