मुंबईच्या रस्त्यांवर २१ हजार कोटींचा खर्च झाला पण...

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 27, 2022 | 20:33 IST

21 thousand crores were spent on the roads of Mumbai but... : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी २१ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

21 thousand crores were spent on the roads of Mumbai but...
मुंबईच्या रस्त्यांवर २१ हजार कोटींचा खर्च झाला पण...  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या रस्त्यांवर २१ हजार कोटींचा खर्च झाला पण...
  • मुंबईच्या रस्त्यांची अवस्था दयनीय
  • अमीत साटम यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र

21 thousand crores were spent on the roads of Mumbai but... : मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी २१ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार अमीत साटम यांनी केली आहे. साटम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबईच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस उपाय करण्याची मागणी केली आहे.

Mumbai Crime: मुंबई हादरली ! १३ वर्षीय मुलावर ६ अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार

Shiv Sena: 'बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का नाही पळाला?' कोणी केला खडा सवाल?

मुंबईच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी २४ वर्षांत २१ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खर्च करूनही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याची बाब आमदार अमीत साटम यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. नियोजन, दूरदृष्टी आणि विकासाचा विचार यांचा अभाव असल्यामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे मत अमीत साटम यांनी व्यक्त केले.  

प्रत्येक रस्त्यासाठी छोट्या निविदांऐवजी पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे आणि शहरासाठी प्रत्येकी एक अशा तीन निविदा काढून दर्जेदार रस्ते तयार करून घ्यावेत, अशी मागणी अमीत साटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रस्त्यांच्या निविदेतच युटिलिटी कॉरिडॉरची तरतूद करावी. पाणी, गॅस, वीज, इंटरनेट या युटिलिटींसाठी नियोजन करावे, अशीही मागणी अमीत साटम यांनी केली आहे. निविदेच्या अटी अशा असाव्यात की केवळ भारत सरकार आणि NHAI सोबत काम करणार्‍या मोठ्या पायाभूत सुविधा कंपन्या या निविदेत भाग घेऊ शकतील. ज्यांनी मुंबई मनपासोबत वर्षानुवर्षे काम केले आहे, अशा उत्तम काम करणाऱ्या कंपन्याच निविदा प्रक्रियेत सहभागी होतील अशी खबरदारी घ्यावी, अशीही मागणी अमीत साटम यांनी केली आहे.

पात्र फेरीवाल्यांना मुंबईतील निवडक भागांमध्ये व्यवसाय करू द्यावा. यासाठी निश्चित नियमावली तयार करावी. यामुळे मुंबईतील इतर अनेक रस्ते आणि पदपथ वापरासाठी मोकळे राहतील, असे अमीत साटम यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी