24 hours Jumbo Mega block : उद्या मध्य रेल्वेवर २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक, कळवा ते ठाकूर्लीदरम्यान रेल्वे सेवा राहणार बंद

24 hours Jumbo Mega block दोन जानेवारी रोजी मध्य रेल्वे २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेणार आहे.  दिवा ते ठाणे दरम्यान पाचव्या मार्गिकेसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी कळवा ते ठाकूर्ली दरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

mega block
मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दोन जानेवारी रोजी मध्य रेल्वे २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेणार आहे.
  • दिवा ते ठाणे दरम्यान पाचव्या मार्गिकेसाठी हा मेगाब्लॉक
  • कळवा ते ठाकूर्ली दरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे बंद

24 hours Jumbo Mega block :  मुंबई :  दोन जानेवारी रोजी मध्य रेल्वे २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेणार आहे. दिवा ते ठाणे दरम्यान पाचव्या मार्गिकेसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी कळवा ते ठाकूर्ली दरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

२४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर  २ जानेवारी २०२२ रात्री २ वाजल्यापासून सोमवार ३ जानेवारी रात्री दोन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. १ जानेवारी रोजी रात्री ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते २ जानेवारी रात्री ११ वाजून ५२ मिनिटापर्यंत कल्याण ते सीएसएमटीपर्यंत सुटणार्‍या गाड्या स्लो/सेमीफास्ट गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या काळात ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळा स्थानकावर गाडी थांबणार नाही. 

घरून निघण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या

  • मेगाब्लॉक दरम्यान कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर एकही लोकल थांबणार नाही. 
  • कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरून लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. 
  • प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जादा बस सोडल्या आहेत. 
  • मेगाब्लॉकदरम्यान डोंबिवली गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 
  • मेगाब्लॉकवेळी सर्व धिम्या लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्थानकावर फास्ट मार्गिकेवरील फलाटावर थांबतील. 


अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

या मेगाब्लॉकमुळे अमरावती-मुंबई एक्सप्रेस, 12140 नागपुर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आणि 17611 नांदेड़-मुंबई राज्यरानी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर  11007/ 11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, 12071/ 12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, 12109/12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, 11401 मुंबई-अदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, 12123/ 12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, 12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस, 12139 मुंबई-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस, 11139 मुंबई-गडग एक्सप्रेस आणि 17612 मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस आणि 11140 गडग-मुंबई एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी