24 Thousand Women Missing महाराष्ट्रातील २४ हजार महिला बेपत्ता

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 23, 2021 | 23:47 IST

24 Thousand Women Missing From Maharashtra As Per National Crime Records Bureau Data : महाराष्ट्रातील सुमारे २४ हजार महिला बेपत्ता आहेत. राज्यातील ६३ हजार २५२ महिला वर्षभरात बेपत्ता झाल्या. यापैकी सुमारे २४ हजार महिलांचा ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही, त्या अद्याप बेपत्ता आहेत.

24 Thousand Women Missing From Maharashtra
महाराष्ट्रातील २४ हजार महिला बेपत्ता  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील २४ हजार महिला बेपत्ता
  • राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडे असलेल्या नोंदींमधून ही बाब प्रकाशात आली
  • ६३ हजार २५२ महिला वर्षभरात बेपत्ता झाल्या यापैकी सुमारे २४ हजार महिलांचा ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही

24 Thousand Women Missing From Maharashtra As Per National Crime Records Bureau Data : मुंबई : महाराष्ट्रातील सुमारे २४ हजार महिला बेपत्ता आहेत. राज्यातील ६३ हजार २५२ महिला वर्षभरात बेपत्ता झाल्या. यापैकी सुमारे २४ हजार महिलांचा ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही, त्या अद्याप बेपत्ता आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडे असलेल्या नोंदींमधून ही बाब प्रकाशात आली.

राज्यातल्या बेपत्ता झालेल्या महिलांपैकी ४० हजार ९५ जणींचा शोध लागला, त्या सापडल्या आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात वर्षभरात २ हजार १६३ हत्या झाल्या. या हत्यांपैकी ५६४ हत्या महिलांच्या झाल्या. प्रेमप्रकरणांमधून ११६ आणि अनैतिक संबंधांतून १८३ महिलांची हत्या झाली. मुंबईत ११ महिन्यांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या ९९९ गुन्ह्यांची नोंद झाली. नोंदविलेल्या गुन्ह्यांपैकी ८५९ गुन्ह्यांची उकल झाल्याची नोंद आहे. पण १४० अल्पवयीन मुली कुठे आहेत या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. 

महाराष्ट्रात सात वर्षांत २५ हजार ४६९ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. यापैकी ६ हजार ३०६ गुन्ह्यांची उकल झाली. यापैकी ३८३ प्रकरणे न्यायालयात निकाली निघाली आणि ९९ आरोपींना शिक्षा झाली.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडे असलेल्या नोंदींनुसार महिलांविरोधातील गुन्ह्यांत उत्तरप्रदेशचा पहिला, पश्चिम बंगालचा दुसरा, राजस्थानचा तिसरा आणि महाराष्ट्राचा चौथा क्रमांक आहे. पण २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये राज्यातील महिलांविरोधी गुन्ह्यांमध्ये ५ हजार १९० ची घट नोंदविली गेली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी