26/11 Mumbai Attack : त्या काळरात्रीच्या जखमा प्रत्येक भारतीयांच्या मनात अजूनही कोऱ्या, दहशतवादी हल्ल्यात गेला 166 निरपराधांचा बळी

मुंबई
Updated Nov 26, 2021 | 11:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.

 26/11 Mumbai Attack: Black Night Wounds Touch Every Indian's Mind, Terror Attack Kills Nearly 166 Innocents
26/11 च्या हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण, 166 जणांचा गेला होता जीव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 26/11 च्या मुंबई दहशतलवादी हल्याने मुंबई हादरली
  • काही दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती.
  • जवळपास 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती.

26/11 Mumbai Attack मुंबई : 26 नोव्हेंबर 2008... हा मुंबई आणि संपूर्ण देशाला हादरवणारा दिवस. काही दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकर कधीच विसरु शकणार नाही.  आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. (26/11 Mumbai Attack: Black Night Wounds Touch Every Indian's Mind, Terror Attack Kills Nearly 166 Innocents)

2008 मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी देशाची शान म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर केला होता, हॉटेल ताज, नरिमन हाऊस, होटल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेऊन मुंबईला वेठीस धरलं होतं. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली आहे. आजही मागे वळून पाहिलं तर नुसत्या कल्पनेने अंगावर काटा येतो.

परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाल्याने जगाचे लक्ष्य 

पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झाले. तर हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचा जीव घेतला. अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली होती. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण जग हादरलं होतं.

मुंबई पोलिसांची शर्तीची लढाई

या दशहतवाद्यांशी मुंबई पोलिसांनी लढला दिल्या. यात या हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आलं. हा दहशतवादी म्हणजे अजमल आमीर कसाब.पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं.  

६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक

पोलिसांना मदत म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्स (आरपीएफ), मरिन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडो यांना पाचारण करण्यात आलं. परंतु अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस लागले. जवळपास 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती.

चार वर्षांनंतर कसाबला फाशी

अजमल कसाबला जिवंत पकडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यास मदत झाली. त्याने न्यायालयात गुन्ह्याची कबुली देल्याने कसाबला मे 2010 मध्ये विशेष कोर्टाने दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. राष्ट्रपतींनीही त्याचा अर्ज फेटाळला. परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये रोष होता. अखेर  21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी