Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, (Mumbai)आज नोकरीसाठी (job)आणि काही कामासाठी घराबाहेर पडत असाल तर लोकल रेल्वेचं वेळापत्रक ( train schedule) पाहून घ्या. त्या वेळापत्रकांनुसार तुम्ही तुमचा फ्लान आखा. कारण आजपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर 27 तासांचा मेगाब्लॉक (megablock) घेण्यात येणार आहे. ठाणे भागातून मुंबईकडे प्रवास करणारे आणि मुंबईकडून ठाण्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. कारण याच दोन्ही भागात हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज 19 आणि उद्या 20 नोव्हेंबरला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सात तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉगदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. (27-hour mega block of Central Railway, cancellation of local and express trains)
अधिक वाचा : श्रद्धाच्या पाठीवर जळती सिगरेट विझवायचा आफताब
आजपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याचं कारण आहे सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू करण्यात येणार आहे. तसेच ठाण्यातील कोपरी ब्रिजच्या कामानिमित्त हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
अधिक वाचा : आदित्य ठाकरे बालिश..., नारायण राणे यांची बोचरी टीका
या मेगाब्लॉक दरम्यान मध्यरेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
ठाण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना कोपरी ब्रिजजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण सात गर्डर टाकण्यात येणार आहे.
19 आणि 20 नोव्हेंबरला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सात तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या शहरांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.