MSRTC Employee Demands एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 29, 2021 | 00:02 IST

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी बुधवार २७ ऑक्टोबर पासून संप पुकारल्यानंतर जाग आलेल्या महाराष्ट्र शासनाने काही घोषणा करुन संप मागे घेण्याचे आवाहन केले.

28 per cent dearness allowance for ST employees like government employees
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता 
थोडं पण कामाचं
  • एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता
  • सध्या एसटी कर्मचाऱ्यांना १२ टक्के आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीसंदर्भात दिवाळीनंतर बैठक घेणार - अनिल परब

28 per cent dearness allowance for ST employees like government employees मुंबईः एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी बुधवार २७ ऑक्टोबर पासून संप पुकारल्यानंतर जाग आलेल्या महाराष्ट्र शासनाने काही घोषणा करुन संप मागे घेण्याचे आवाहन केले. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिला जाईल. तसेच सध्या असलेल्या घरभाड्यात वाढ करू, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. वार्षिक वेतनवाढीसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक असून याबाबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येईल, असे अनिल परब म्हणाले. 

सध्या एसटी कर्मचाऱ्यांना १२ टक्के आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता आहे. परिवहन मंत्र्यांनी केलेली घोषणा अंमलात आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता लागू होईल, असे संकेत राज्य शासनाकडून दिले जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या घरभाड्यात वाढ करू, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे.

संपामुळे राज्यातले २५० पैकी १८२ एसटी डेपो बंद होते. कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करुन घेण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, घोषणांचे राजकारण करण्यापेक्षा एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करुन घ्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी