3 coaches of Belapur Kharkopar local train derail near Kharkopar railway station : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावर लोकल ट्रेन घसरली. रेल्वे खारकोपर स्टेशन जवळ रुळावरून घसरली. यामुळे खारकोपर ते नेरुळ दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ट्रेन रुळावरून घसरण्याची घटना आज (मंगळवार 28 फेब्रुवारी 2023) सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी घडली.
बेलापूर येथून खारकोपरच्या दिशेने जात असलेल्या ट्रेनचे 3 डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि तंत्रज्ञ पोहोचले आहेत. मदतकार्य सुरू आहे. लोकलचे डबे पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या रिलिफ ट्रेनच्या मदतीने प्रवाशांची पुढील रेल्वे प्रवास करण्याची सोय करण्यात आली आहे. पण रुळावरून ट्रेनचे 3 डबे घसरल्यामुळे रेल्वेची हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सध्या केवळ बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गांवरील वाहतूक बंद आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतर मार्गांवरील वाहतूक सुरू आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय । या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा । जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.