INS Ranveer Blast : मुंबई : मुंबईतील नवल डॉकयार्ड येथे युद्धनौका रणवीरवर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात भारतीय नौदलाचे तीन जवान शहीद झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर उपस्थित कर्मचार्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या स्फोटात ११ जण जखमी झाले आहेत.
#Breaking | Three Indian Navy personnel killed, 11 reportedly injured in explosion in internal compartment of INS Ranvir.#INSRanvir #IndianNavy pic.twitter.com/B4KU1z8A1f — TIMES NOW (@TimesNow) January 18, 2022
एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. आयएनएस रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते, त्यावेळी ही घटना निदर्शनास आल्याचे भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच नौदल रुग्णालयात जखमी झालेल्या 11 जणांवर उपचार सुरू आहेत.
Mumbai: 3 Naval personnel die in explosion onboard INS Ranvir, probe ordered — ANI Digital (@ani_digital) January 18, 2022
Read @ANI Story | https://t.co/joqtCvtGIP
#INSRanvir #explosion pic.twitter.com/CA0sarLkFh
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.