दादरकरांच्या चिंतेत वाढ, दादरमध्ये 'कोरोना'चे तीन नवे रुग्ण

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 10, 2020 | 12:52 IST

दादरमध्येही कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.  यात एका हॉस्पिटलमधील दोन नर्सचा समावेश आहे. तर 80 वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दादरमधलाही धोका वाढलेला दिसतोय. 

Dadar stands at 6 now
दादरकरांच्या चिंतेत वाढ, दादरमध्ये 'कोरोना'चे तीन नवे रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • दादरमध्येही कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
  • यात एका हॉस्पिटलमधील दोन नर्सचा समावेश आहे.
  • 80 वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईः दादरमध्येही कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.  यात एका हॉस्पिटलमधील दोन नर्सचा समावेश आहे. तर 80 वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दादरमधलाही धोका वाढलेला दिसतोय. 

यात सुश्रृषा हॉस्पिटलमधील दोन नर्सचा समावेश आहे. आज एका 27 वर्षीय आणि दुसऱ्या 42 वर्षीय नर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर न.चि. केळकर मार्गावरील एका 80 वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या 6वर पोहोचली आहे. 

दादरमध्ये आतापर्यंत दिनकर अपार्टमेंट, सौभाग्य अपार्टमेंट, तावडेवाडी आणि केळकर रोडवर प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून सुश्रृषा हॉस्पिटलमधील दोन रुग्णांचा यात समावेश असल्याने हे हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे. 

धारावीत कोरोनाचा कहर 

धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली आहे.  धारावीत आणखी 5 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे. यातील दोघेजण दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती पालिकेने दिली आहे. या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. धारावीत आता एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. दरम्यान, या दोघांनाही नव्याने क्वॉरंटाइन रुग्णालयात रुपांतरीत करण्यात आलेल्या राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

आज सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी दोघेजण हे तबलिगी समाजाचे आलेले होते. पोलिसांच्या यादीत या दोघांच्या नावाचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता पॉझिटिव्ह निघाले आहेत. धारावीत आज सापडलेल्या पाच रुग्णांपैकी वोकहार्डमधील डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे. त्या वैभव अपार्टमेंटमध्ये राहत असून हा परिसर तात्काळ सील करण्यात आला आहे. दुसरा रुग्ण हा मुस्लिम नगरमधील आहे. कल्याणवाडी येथेही 31 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असून मुरगन चाळ आणि पीएमजीपी कॉलनीतही प्रत्येकी एक पुरुष रुग्ण सापडला आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या 22 वर गेली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी