गोरेगावमध्ये ३ वर्षाचा चिमुकला पडला गटारात, ९ तासांपासून शोधकार्य

मुंबई
Updated Jul 11, 2019 | 10:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

गोरेगावच्या आंबेडकनगर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. काल या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. यावेळी या परिसरातील ज्या गटारात हा चिमुकला पडला त्या गटाराचे झाकड उघडे होते.

cctv footage
सीसीटीव्ही फुटेज 

थोडं पण कामाचं

  • ३ वर्षाचा चिमुकला गटारात
  • ९ तासांपासून शोधकार्य सुरू
  • बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली घटना

मुंबई: मुंबईच्या गोरेगावर येथील  आंबेडकर नगर परिसरातील नाल्याच्या मॅनहोलमध्ये दोन वर्षांचा चिमुरडा पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेला ९ तास उलटून गेले मात्र अद्याप या चिमुरड्याचा शोध लागलेला नाही. पालिका कर्मचारी, पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान बुधवारी रात्रीपासून या मुलाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही. रात्री १०. २४ वाजता ही घटना घडली. 

या घटनेटे सीसीटव्ही फुटेज एएनआयने ट्विटरवर पोस्ट केले आहे. यात दिसतेय एक चिमुरडा रस्त्यावरून चालत चालत त्या गटाराजवळ आला आणि त्या गटारात जाऊन पडला. या चिमुकल्याचा रात्रीपासून शोध सुरू आहे. चिमुकला सापडत नसल्याने या मुलाचे आई-वडील रडत आहेत. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी यासाठी पालिकेला जबाबदार ठरवले आहे. 

 

 

गोरेगावच्या आंबेडकनगर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. काल या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. यावेळी या परिसरातील ज्या गटारात हा चिमुकला पडला त्या गटाराचे झाकड उघडे होते. त्यामुळे या गटारातून पावसाचे पाणी वाहत होते. रात्रीच्या सुमारा हा मुलगा खेळता खेळता त्या गटाराजवळ आला आणि चुकून यात पडला. दिव्यांशू असं या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा या चिमुकल्याच्या जवळपास कोणीच नव्हते. या घटनेनंतर त्याची आई त्याला शोधत तेथे आली मात्र त्याचा शोध न लागल्याने त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा चिमुकला गटारात पडल्याचे दिसले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दल, पोलीस तसेच पालिका कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस तसेच पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लगेचच शोधकार्य सुरू केले. 

 

याआधी २०१७मध्ये पावसादरम्यान मॅनहोलचे झाकण उघडे राहिल्याने बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसात पाण्याचा निचरा व्हावा म्हणून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उघडलेल्या मॅनहोलमध्ये पडून डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. वरळी किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह आढळला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
गोरेगावमध्ये ३ वर्षाचा चिमुकला पडला गटारात, ९ तासांपासून शोधकार्य Description: गोरेगावच्या आंबेडकनगर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. काल या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. यावेळी या परिसरातील ज्या गटारात हा चिमुकला पडला त्या गटाराचे झाकड उघडे होते.
Loading...
Loading...
Loading...