Shivsena Pramukh memorial : शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या २७ टक्के कामासाठी ३५.९७ कोटी खर्च

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 30, 2021 | 00:01 IST

35.97 crore for 27 percent work of Shivsena Pramukh memorial : मुंबईत दादरमध्ये शिवाजी पार्क मैदानाजवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक विकसित होत आहे. या स्मारकाचे आतापर्यंत २७ टक्के काम झाले आहे. पूर्ण झालेल्या २७ टक्के कामासाठी प्रकल्प निधीतील ३५.९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

35.97 crore for 27 percent work of Shivsena Pramukh memorial
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या २७ टक्के कामासाठी ३५.९७ कोटी खर्च 
थोडं पण कामाचं
  • शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या २७ टक्के कामासाठी ३५.९७ कोटी खर्च
  • स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम २३ मे २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
  • पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटींची आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटींची तरतूद

35.97 crore for 27 percent work of Shivsena Pramukh memorial : मुंबई : मुंबईत दादरमध्ये शिवाजी पार्क मैदानाजवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक विकसित होत आहे. या स्मारकाचे आतापर्यंत २७ टक्के काम झाले आहे. पूर्ण झालेल्या २७ टक्के कामासाठी प्रकल्प निधीतील ३५.९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवली आहे.

स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम २३ मे २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत स्मारकाचे २७ टक्के काम झाले आहे. या कामावर ३५.९७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. वास्तुविशारद आभा लांबा नरियन यांना ६.४७ कोटी रुपयांचे काम दिले आहे. आतापर्यंत केलेल्या कामासाठी आभा लांबा नरियन यांना ३.२१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

स्मारकाचे कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला १८०.९९ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. यापैकी २८.९३ कोटी रुपये आतापर्यंत कंपनीला देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे, मुद्रांक शुल्क, परवानगी शुल्क यावर ३.८२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

नियोजीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटींची तरतूद आहे. या अंतर्गत एन्ट्रन्स ब्लॉक, आर्टिस्ट सेंटर, इंटरप्रिटेशन सेंटर, हेरिटेज कन्झर्वेशन, महापौर बंगल्याचा जीर्णोद्धार आणि संग्रहालय आणि लँडस्केपिंगमध्ये संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे.

स्मारकाचा दुसरा टप्पा अद्याप प्रस्तावीत आहे. यात तंत्रज्ञान, लेजर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथन, कथाकथन, फिल्म, आभासी वास्तव, संग्रहालय कथनातील ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक या कामांचा समावेश आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी २० फेब्रुवारी २०१९ रोजी १०० कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता. पण १६ मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ४०० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. या ४०० कोटींपैकी २५० कोटी रुपयांची तरतूद पहिल्या टप्प्यासाठी आणि १५० कोटी रुपयांची तरतूद दुसऱ्या टप्प्यासाठी करण्याचा निर्णय झाला. नियोजन झाल्यानंतर काम सुरू झाले. आतापर्यंत २७ टक्के काम झाले असून स्मारकाचे पुढील काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी