Central Railway Block : मध्य रेल्वेवर ३६ तासांचा सुविधा ब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 07, 2022 | 22:41 IST

36 hours Suvidha Block on Central Railway between Thane Kalwa, Change in Central Railway Timetable : मध्य रेल्वे ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेणार

36 hours Suvidha Block on Central Railway between Thane Kalwa
मध्य रेल्वेवर ३६ तासांचा सुविधा ब्लॉक 
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वेवर ३६ तासांचा सुविधा ब्लॉक
  • ब्लॉक शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री २ पर्यंत
  • सुविधा ब्लॉकच्या काळात रेल्वे वाहतुकीत बदल

36 hours Suvidha Block on Central Railway between Thane Kalwa, Change in Central Railway Timetable : मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (मेन लाइन) ठाणे-दिवा ५व्या आणि ६व्या मार्गिकेसाठी नव्याने टाकलेल्या रूळांचे (ट्रॅक) कट व  कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी, मध्य रेल्वे ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री २ पर्यंत आहे. 

ब्लॉक दरम्यान, ठाणे ते विटावा रोड दरम्यान पुलाखालील नवीन टाकलेला ट्रॅक कट करून सध्याच्या डाउन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल.  त्याचप्रमाणे क्रॉसओवर, टर्न आऊट, यार्ड रीमॉडेलिंगसाठी रुळावरील डिरेलींग स्विच तसेच ठाणे आणि कळवा येथील इंटरलॉकिंग व्यवस्थेत बदल करणे व इंटरलॉकिंग सुरू करणे ही कामं केली जातील. ७ टॉवर वॅगन, ३ युनिमॅट/ड्युओमॅटिक मशीन, २ डिझेल मल्टी लोको, एक बॅलास्ट रेक, १ डीबीकेएम इत्यादींचा वापर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल व दूरसंचार कामांसाठी केला जाईल. सुविधा ब्लॉकच्या काळात रेल्वे वाहतुकीत बदल केला जाईल. 

शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १ ते दुपारी २ या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्धजलद  सेवा कल्याण ते माटुंगा दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर  थांबणार नाहीत पुढे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तसेच दुपारी २ नंतर अप धीम्या/अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा  ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२.५४ ते १.५२ पर्यंत दादरहून सुटणाऱ्या धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. दुपारी २ नंतर डाउन धिम्या/अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

सुविधा ब्लॉकच्या कालावधीत कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून चढणाऱ्या प्रवाशांना अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवलीतून सुटणा-या/टर्मिनेट होणारी उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा येथील जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील.  उपनगरीय सेवा सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी वेळापत्रकानुसार कार्यरत राहतील.

सुविधा ब्लॉक असल्यामुळे शुक्रवार ७ जानेवारी २०२२ आणि शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी सुटणाऱ्या निवडक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस, 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आणि 17611 नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

सुविधा ब्लॉक असल्यामुळे शनिवार ८ जानेवारी २०२२ आणि रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी सुटणाऱ्या निवडक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात 11007 / 11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, 12071 / 12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, 12109 /12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, 11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, 12123 /12124 मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, 
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस, 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, 11139 मुंबई -गदग एक्सप्रेस आणि 17612 मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

सुविधा ब्लॉक असल्यामुळे रविवार ९ जानेवारी २०२२ आणि सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी सुटणाऱ्या निवडक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात 11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस आणि 11140 गदग-मुंबई एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

17317 हुबळ्ळी-दादर एक्सप्रेस या गाडीचा प्रवास शुक्रवार ७ जानेवारी २०२२ आणि शनिवार ८ जानेवारी २०२२ रोजी पुणे येथे संपेल. तसेच 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस या गाडीचा प्रवास शनिवार ८ जानेवारी २०२२ आणि रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी पुणे येथे संपेल.

शनिवार ८ जानेवारी २०२२ आणि रविवार ९ जानेवारी २०२२ रोजी 17318 दादर-हुबळ्ळी एक्सप्रेस या गाडीचा प्रवास पुण्यातून सुरू होईल. तसेच रविवार ९ जानेवारी २०२२ आणि सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी 11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या गाडीचा प्रवास पुण्यातून सुरू होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी