Assembly Speaker Election : शिवसेनेनं बजावलेला व्हीप 39 आमदारांनी मोडला, तक्रार दाखल, तर शिंदे गटाकडूनही 16 आमदारांविरोधात पत्र

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 03, 2022 | 16:37 IST

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) पार पडली आहे. या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपला विजय मिळाला असून राहुल नार्वेकरांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. दरम्यान या निवडणुकीदरम्यान शिवसेनेनं (shivsena) व्हीप बजावला होता. तो व्हीप 39 आमदारांनी मोडला असून या 39 सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (sunil prabhu )यांनी दिली.

39 MLAs break Shiv Sena's whip, lodge complaint
सेनेच्या 16 विरुद्ध 39 जणांची लढाई, शिवसेनेकडून तक्रार दाखल   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले
  • शिवसेनेतील 16 आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केलं आहे, अशी तक्रार शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून भरत गोगावले यांनी केली

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) पार पडली आहे. या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपला विजय मिळाला असून राहुल नार्वेकरांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. दरम्यान या निवडणुकीदरम्यान शिवसेनेनं (shivsena) व्हीप बजावला होता. तो व्हीप 39 आमदारांनी मोडला असून या 39 सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (sunil prabhu )यांनी दिली. तर शिंदे गटाकडून ही 16 आमदारांनी व्हीप मोडला असल्याची तक्रार दिली आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबद्दल शिवसेनेनं तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. सेनेची तक्रार ही सभागृहाच्या पटलावर घेतली आहे. लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक झाली. पण, विधानसभेच्या नियमानुसार, पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्या व्हीपच्या विरोधात 39 आमदारांनी मतदान केलं आहे. आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे.  सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आधीच याचिका दाखल केली आहे. आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती सुनिल प्रभू यांनी दिली.

या 39 आमदारांनी व्हीप मोडून मतदान केलं आहे. त्यामुळे आमचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे. तांत्रिक दृष्ट्या जे योग्य आहे, त्यानुसार कारवाई केली पाहिजे असं सुनील प्रभू म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेले आहे. शिवसेनेतील 16 आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केलं आहे, अशी तक्रार शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून भरत गोगावले यांनी केली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी