Mumbai rains: अवघ्या पाच दिवसांत मुंबईत ४३ टक्के पाऊस, पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

जुनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार कमबॅक केलेले आहे. आतापर्यंत केवळ मुंबईत ४३ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस वाढला असला तरी मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पाणी साचत आहे. गुरूवारी मध्य रेल्वेवरील रुळावर भिंत कोसळली होती, त्यामुळे लोकल उशीराने धावत  होती.

heavy rain
मुसळधार पावसाचा इशारा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जुनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार कमबॅक केलेले आहे. आ
  • आतापर्यंत केवळ मुंबईत ४३ टक्के पाऊस झाला आहे.
  • पाऊस वाढला असला तरी मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पाणी साचत आहे.

Heavy Rain: मुंबई : जुनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार कमबॅक केलेले आहे. आतापर्यंत केवळ मुंबईत ४३ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस वाढला असला तरी मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पाणी साचत आहे. गुरूवारी मध्य रेल्वेवरील रुळावर भिंत कोसळली होती, त्यामुळे लोकल उशीराने धावत  होती. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

अधिक वाचा : मुंबईत पावसाचं तांडव..! लाईफलाइन विस्कळीत, लोकल ट्रेनचं Current Status

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

आज मुंबईत दुपारी एक वाजल्यापासून पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने मुंबईकरांसाठी सूचना जारी केली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गरज असल्यास बाहेर पडण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.  

अधिक वाचा : Maharashtra Rain:अतिवृष्टीचा इशारा, राज्यातल्या 'या' भागातल्या नागरिकांनी घ्या खबरदारी; अलर्ट जारी

मान्सून काळात साधारणतः कुलाबा भागात २२४० आणि सांताक्रुज भागात २७०५ मिमि पाऊस पडतो. यंदा कुलाबा भागात ४३ तर सांताक्रुज भागात ३८ टक्क पावसाची नोंद झाली आहे. गेल्या सोमवारपासून मुंबईत संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासात कुलाबा केंद्रात ११०.६ तर सांताक्रुज केंद्रात १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रालाही पावसाने झोडपून काढले आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

मान्सूनचा जोर पाहतात हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी या भगात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरीलाही आज शनिवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरला ९ ते ११ जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अधिक वाचा : रात्रभर धो-धो पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर जाणून घ्या मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी