धारावीत कोरोनाचा कहर, दोघा तबलिगींसह धारावीत 5 नवे रुग्ण

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 10, 2020 | 12:00 IST

धारावीत आणखी 5 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे. यातील दोघेजण दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

Dharavi total number
धारावीत कोरोनाचा कहर, दोघा तबलिगींसह धारावीत 5 नवे रुग्ण  

थोडं पण कामाचं

  • धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली आहे.
  • धारावीत आणखी 5 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे.
  • या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

मुंबईः धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली आहे. धारावीत आणखी 5 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे. यातील दोघेजण दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, अशी माहिती पालिकेने दिली आहे. या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. धारावीत आता एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. दरम्यान, या दोघांनाही नव्याने क्वॉरंटाइन रुग्णालयात रुपांतरीत करण्यात आलेल्या राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

आज सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी दोघेजण हे तबलिगी समाजाचे आलेले होते. पोलिसांच्या यादीत या दोघांच्या नावाचा समावेश होता. त्यांची तपासणी केली असता पॉझिटिव्ह निघाले आहेत. धारावीत आज सापडलेल्या पाच रुग्णांपैकी वोकहार्डमधील डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे. त्या वैभव अपार्टमेंटमध्ये राहत असून हा परिसर तात्काळ सील करण्यात आला आहे. दुसरा रुग्ण हा मुस्लिम नगरमधील आहे. कल्याणवाडी येथेही 31 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असून मुरगन चाळ आणि पीएमजीपी कॉलनीतही प्रत्येकी एक पुरुष रुग्ण सापडला आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या 22 वर गेली आहे. 

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्यास संपूर्ण राज्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील.  

धारावीत आज सापडलेल्या पाच रुग्णांपैकी दोनजण दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले तबलिगी जमातचे कार्यकर्ते आहेत. मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या तबलिगींची पोलिसांनी यादी काढली होती. त्यातील हे दोघेही जण आहेत. त्यातील एकजण बलिगा नगर येथील तर दुसरा पीएमजीपी कॉलनीतील रहिवासी आहे. हे दोघेही मरकजहून आलेले असून धारावीत राहत होते. बलिगा नगरमध्ये राहून नंतर हे केरळला गेले नव्हते, असंही पालिकेने स्पष्ट केलं आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी