अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते आले, मान खाली घातली अन् शांतपणे निघून गेले...

maharashtra assembly monsoon session : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले. यावेळी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

50 Khoke slogans, Uddhav faction teased Shinde MLAs, monsoon session of Maharashtra Legislative Assembly
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते आले, मान खाली घातली अन् शांतपणे निघून गेले...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाने शिंदे गटाला डवचले
  • 50 खोके एकदम ओके घोषणाबाजी
  • शंभूराज देसाईंनी केला प्रतिप्रश्न

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरू झाली. यावेळी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनात दिसताच उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.  (50 Khoke slogans, Uddhav faction teased Shinde MLAs, monsoon session of Maharashtra Legislative Assembly)

अधिक वाचा : Aaditya Thackeray: 'मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात', आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट)च्या आमदारांनी फलक हातात घेऊन शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यादरम्यान शिंदे मान खाली घाऊन तेथून निघून गेले.

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीस  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ते सर्व जण विधीमंडळात जात असताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आमदार आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे काही सदस्यही घोषणाबाजीत सहभागी झाले होते. यावेळी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आले. या घोषणा एेकून मुख्यमंत्री शिंदे शांतपणे निघून गेले. मात्र, शिंदेंच्या मागे असलेल्या राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी तुम्हाला पाहिजे का?, असा प्रतिसवाल केला.

दरम्यान, विधानसभेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर काही वेळ कामकाज झाले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेंकर यांनी सभागृहाची बैठक स्थगित होत असल्याचे सांगितले. आता उद्या गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता विधानसभेची विशेष बैठक सुरू करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी