Mumbai Flyover : मुंबईत प्रवास करायचा म्हटलं म्हणजे अनेकांच्या कपाळावर आठ्या येत असतात. मुंबईकरांचा प्रवासाचा हा त्रास कमी करण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्न करत असते. मुंबई महापालिका दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लवकरच कर्णाक बंदर ते ग्रँटरोड स्टेशनपर्यंतचा 5.56 किलोमीटर लांबीचा पूल बांधणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी.वेलरासू यांनी याविषयीची माहिती दिली. दरम्यान याबाबत अजून कोणतेही टेंडर आलेले नाही. टेंडर मिळल्यानंतर बांधकाम सुरू करण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत 42 महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे.
पूल खात्याने अधिक माहिती देताना म्हटले आहे की, मुंबईतल्या पी.डीमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजीक सुरू होणाऱ्या या ईस्टर्न फ्री-वे येथून हा मार्ग तयार करण्यात येईल. हा मार्ग थेट ग्रँट रोड स्टेशनपर्यंत असणार आहे. ईस्टर्न फ्री-वे पासून ग्रँटरोड स्टेशनपर्यंतचा रस्त्याने प्रवास करण्यासाठी 50 मिनिटे लागतात. या प्रवासाचे अंतर 5.56 किलोमीटर आहे. आता हे अंतर आपण अवघ्या 6 मिनिटात पार करता येईल.
अधिक वाचा : सारा तेंडुलकर शिक्षणात शुभमन गिलपेक्षा आहे खूप सरस, जाणून घ्या दोघांचे क्वॉलिफिकेशन
5.56 किलोमीटरचे हे अंतर कमी करण्यासाठी नवीन पूल बांधल्यानंतर हे अंतर 6 मिनिटांत पार करता येईल. ही बाब लक्षात घेता दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी आणि अधिक वेगवान होण्यासाठी या प्रस्तावित मार्गामुळे मोठे बळ मिळणार आहे, असा विश्वासही पूल खात्याद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
अधिक वाचा : या आहेत जगातील टॉप-9 महिला क्रिकेटपटू
ईस्टर्न फ्री-वेला (eastern freeway) जोडलेल्या पी. डिमेल्लो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित मार्ग (पूल) हा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रवास सुखाचा होऊन वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल. तसेच सागरी किनारी रस्त्याला ईस्टर्न फ्री-वेशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. डॉ. बी. आर.आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH),ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील, म्हणजेच दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत आणि अधिक वेगवान करण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.