Mumbai Crime: मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, 6 किलो केटामाईन ड्रग्ज जप्त

मुंबई
Updated Mar 20, 2023 | 19:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरी परिसरात छापा टाकून एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 6 किलो केटामाईन ड्रग्ज जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 8 कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे.

6 kg of ketamine drugs seized in Mumbai drug racket busted
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • US-UAE ला पाठवले जायचे ड्रग
  • कुरिअर कंपनीसाठी काम करायचे पेडलर
  • अंडरवर्ल्ड लिंकचाही पोलीस तपास करत आहेत

मुंबई : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरी परिसरात छापा टाकून एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल 6 किलो केटामाईन ड्रग्ज जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 8 कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासानुसार हे रॅकेट आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग असून ते मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आले होते, असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात पोलीस अंडरवर्ल्ड लिंकचाही पोलीस तपास करत आहेत. छाप्यात पोलिसांनी 2 ड्रग्ज तस्करांनाही अटक केली आहे. 

US-UAE ला पाठवले जायचे ड्रग 

रिपोर्ट्सनुसार, हे रॅकेट युरोपियन देशांमध्ये केटामाइन ड्रगची तस्करी करत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे तस्कर पार्ट्यांमध्ये प्रति ग्रॅम $60 ते $100 च्या दरात ड्रग्ज विकायचे. अमली पदार्थांची तस्करी करणारी हीच टोळी अमेरिका आणि दुबईमध्ये बेकायदेशीर ड्रग्स, पेनकिलर, झोप आणि सेक्स पॉवर वाढवणारी औषधं विकत होती. 

अधिक वाचा: मुंबईतील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

कुरिअर कंपनीसाठी काम करायचे पेडलर 

ड्रग्ज तस्करीची माहिती मिळताच डीसीपी दत्ता नलवडे यांच्या नेतृत्वात अंमली पदार्थ आणि खंडणी विरोधी सेलच्या विशेष पथकाने अंधेरीत छापा टाकला. या छाप्यात दोन जणांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे गुन्हे विभागाचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी सांगितलं. 

आरोपी विजय राणे आणि मोहम्मद अस्लम शेख हे कुरिअर कंपनीत काम करायचे. ही टोळी 4 वर्षांपासून सक्रीय होती, या टोळीचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी आरोपींकडून 15 किलो 647 ग्रॅम केटामाईन जप्त केले आहे. 

अधिक वाचा: Bus accident । मुंबई-बेंगलुरु महामार्गावर प्रवाशांनी खचाखच भरलेली लक्झरी बस पलटी, पाच जण गंभीर जखमी

जगभरात सप्लाय करायचे

एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे ड्रग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपमधील देशांमध्ये पाठवले जात आहे. या देशांतील पार्ट्यांसाठी या ड्रगला विशेष मागणी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित लोकं देशात वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज तयार करून ते मुंबईत आणायचे आणि तिथून जगभरात सप्लाय करायचे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी