प्रेयसीसोबत संभोग करताना 61 वर्षीय प्रियकराचा मृत्यू,अपघाती मृत्यूची नोंद

मुंबई
भरत जाधव
Updated May 24, 2022 | 11:44 IST

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकर आणि प्रेयसी संभोग (Physical Relation) करताना प्रियकराचा मृत्यू (Death During Physical Relation) झाला आहे. ही घटना मुंबईतील कुर्ला (Kurla)परिसरात घडली. ही माहिती कळताच, हॉटेलमधील (Hotel) कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

61-year-old boyfriend dies while having sex with girlfriend
प्रेयसीसोबत संभोग करताना 61 वर्षीय प्रियकराचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
  • मृताचे वय हे 61 तर त्याच्या प्रेयसीचे वय हे 40 असून पोलीस वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा ते करत आहेत.
  • मृताची प्रेयसी ही वरळी कोळीवाड्यात राहणारी आहे. ती एका खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकर आणि प्रेयसी संभोग (Physical Relation) करताना प्रियकराचा मृत्यू (Death During Physical Relation) झाला आहे. ही घटना मुंबईतील कुर्ला (Kurla)परिसरात घडली. ही माहिती कळताच, हॉटेलमधील (Hotel) कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मृताचे वय हे 61 तर त्याच्या प्रेयसीचे वय हे 40 असून पोलीस  वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा ते करत आहेत. दरम्यान, मृताच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा वार आढळून आलेले नाहीत. 

मुंबईतील कुर्ला येथे एलबीएस रस्त्यावर जीएसके नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी मृत व्यक्तीने आपल्या प्रेयसीसोबत सोमवारी सकाळच्या सुमारास चेक इन केलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांनी लैंगिक संबंध  (Physical Relation) ठेवले. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. लैंगिक संबंधादरम्यान, या पुरुषाला अस्वस्थ वाटू लागलं आणि संभोगाच्या अवस्थेतच तो बेशुद्ध झाला. यावेळी त्याची प्रेयसी ही अत्यंत घाबरुन गेली. तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं. यानंतर या पुरुषाला सायन रुग्णालयात आणलं गेलं. मात्र, इथं आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृताची प्रेयसी ही वरळी कोळीवाड्यात राहणारी आहे. ती एका खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे. हॉटेलमध्ये येताना त्यांनी कोणते आयडी प्रुफ दाखवले होते, तेदेखील पोलीस तपासत आहेत. वैद्यकीय अहवालानंतर या मृत्यूचे कारण समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी