Minor Raped : मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय वृध्दाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. नराधम आरोपीने मुलीला चहा आणि बिस्किटाचे आमिष दाखवले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भायखळ्यात राहणार्या एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने एका लहान मुलीला चहा आणि बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. नंतर या मुलीला एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता न करण्याची धमकीही दिली होती.
नंतर मुलीने आपल्या आईला झाला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईन तत्काळ पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली आणि त्याची रवानगी तुरुंगाग केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.