Mumbai Rape Crime: अल्पवयाचा फायदा घेत 70 वर्षीय व्यक्तीचा 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली 10 वर्षाची कैद

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 09, 2022 | 08:49 IST

Mumbai Rape Crime: अल्पवयीन (Minor) मुलीवर (Girl) एका 70 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत वारंवार लैंगिक अत्याचार (Rape) केल्या प्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने (Special Court of Mumbai) आरोपीला 10 वर्ष कैदेची  (imprisonment) शिक्षा सुनावली आहे.

70-year-old man rapes 17-year-old girl
70 वर्षीय व्यक्तीचा 17 वर्षीय मुलीवर बलात्कार  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • एका वर्षाच्या आत आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवलं
  • पीडिता आरोपीच्या दुकानात टेलरिंगचे काम करण्यास जात
  • आरोपीने पीडितेच्या असुरक्षितेचा फायदा घेत बलात्कार केला.

Mumbai Rape Crime:   मुंबई : अल्पवयीन (Minor) मुलीवर (Girl) एका 70 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत वारंवार लैंगिक अत्याचार (Rape) केल्या प्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने (Special Court of Mumbai) आरोपीला 10 वर्ष कैदेची  (imprisonment) शिक्षा सुनावली आहे. दरम्यान अल्पवयीन पीडिता गरोदर (Pregnant) राहिल्याने ज्यामुळे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा खटल्याचा निकाल एका वर्षाच्या आत लागला असून न्यायालयाने अल्पवयीन मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुराव्याच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले आहे. 

तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या 17 वर्षीय मुलीला सार्वजनिक रुग्णालयात आणल्याची माहिती मिळाल्यानंतर 2019 मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मुलगी आणि तिच्या आईने सुरुवातीला तपशील देण्यास नकार दिला होता. त्यावेळी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी मुलीशी बोलण्यासाठी एका समुपदेशकाला आणले आणि त्यानंतर, तिने तिच्या सोबत घडलेल्या अत्याचाराविषयीची माहिती दिली. त्यानंतर 2020 मध्ये खटला सुरू झाला. पीडितेच्या साक्षनुसार, पीडिता आरोपीच्या मालकीच्या टेलरिंग दुकानात काम करत होती. काही महिन्यांनंतर तिला उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे उघड झाले. 

पीडितेचा गर्भपात झाल्यानंतर तेव्हा डीएनए जतन करण्यात आला आणि तो आरोपीशी जुळला. त्यावर न्यायालयाने 70 वर्षांच्या वृद्धाला दोषी ठरवले. आरोपीने पीडितेच्या वयावर वाद घातला आणि हे संबंध सहमतीने असल्याचे सांगितले. तर न्यायालयाने सांगितले की, वयातील फरकाने आरोपीने अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेतल्याचे दिसून येते. पीडित मुलगी खूप लहान होती आणि ती आरोपीच्या दुकानात जात होती. आरोपीने तिच्या असुरक्षित परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचवेळी आरोपीचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेता, मला असे वाटते की, आरोपींना फारशी सौम्यता दाखवली जाऊ शकत नाही, विशेष न्यायाधीश भारती काळे यांनी शुक्रवारी दिलेल्या त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी