Mumbai Crime: ७५ वर्षीय व्यावसायिकावर बलात्काराचा आरोप; महिलेला शांत राहण्यासाठी दिली डी-गॅंगची धमकी

मुंबई
Updated Jun 16, 2022 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rape Case filed against businessman । मुंबईतील जुहू परिसरात ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ७५ वर्षीय व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व्यावसायिकाने तिला हे सांगितल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

75-year-old Mumbai businessman charged with rape, complaint lodged at Juhu police station
मुंबईतील ७५ वर्षीय व्यावसायिकावर बलात्काराचा आरोप  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील ७५ वर्षीय व्यावसायिकावर बलात्काराचा आरोप.
  • महिलेला शांत राहण्यासाठी दिली डी-गॅंगची धमकी.
  • आरोपी व्यावसायिकाने माझ्याकडून २ कोटी रुपये घेतले होते - महिला.

Rape Case filed against businessman । मुंबई : मुंबईतील (Mumbai) जुहू (Juhu) परिसरात ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ७५ वर्षीय व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व्यावसायिकाने तिला हे कथितपणे सांगितल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच याची विचारणा केली असता त्याने दाऊद इब्राहिमचे (Dawood Ibrahim) नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. (75-year-old Mumbai businessman charged with rape, complaint lodged at Juhu police station). 

अधिक वाचा : चहा कपातीमुळे सुधारेल पाकची अर्थव्यवस्था -पाकिस्तानचे मंत्री

फोनवरून डी-गॅंगने धमकावले - महिला

या प्रकरणाबाबत तक्रारदार महिलेने असेही सांगितले की, "डी-गँग'कडून तिला आरोपी व्यावसायिकाचे  म्हणणे न ऐकल्यास जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता, त्यानंतर तिने तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले."

२ कोटींचे काय प्रकरण आहे?

महिलेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले की, "आरोपी व्यावसायिकाने माझ्याकडून २ कोटी रुपये घेतले होते, जे अनेकवेळा मागून देखील परत मिळाले नाहीत. माझ्यावरील अन्याय व अत्याचाराविरोधात मी आवाज उठवताच त्यांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी घेतली प्रकरणाची दखल

याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी सांगत आहेत की, महिलेच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. खटल्यातील विविध पैलू लक्षात घेऊन वेगाने शोधमोहीम राबवली जात आहे. त्यानंतरच या प्रकरणी अधिकृतपणे काही सांगता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी