Mumbai Railway : पूल पाडण्यासाठी रेल्वेचा 8 तासांचा ब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 10, 2023 | 09:15 IST

8 hour block of Western Railway to demolish bridge in Mumbai : अंधेरीतील गोखले पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार 11 मार्च 2023 रोजी रात्री आठ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक आहे.

Mumbai Railway
पूल पाडण्यासाठी रेल्वेचा 8 तासांचा ब्लॉक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पूल पाडण्यासाठी रेल्वेचा 8 तासांचा ब्लॉक
  • अंधेरीतील गोखले पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर 8 तासांचा ब्लॉक
  • शनिवार 11 मार्च 2023 रोजी रात्री आठ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक

8 hour block of Western Railway to demolish bridge in Mumbai : अंधेरीतील गोखले पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार 11 मार्च 2023 रोजी रात्री आठ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक आहे. ब्लॉक असल्यामुळे शनिवार 11 मार्च 2023 रोजी रात्री 11.15 वाजता विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल (फास्ट लोकल) सुटेल. बोरिवलीहून चर्चगेटसाठी शेवटची धीमी लोकल (स्लो लोकल) रात्री 11.34 वाजता सुटेल.

गोखले पूल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलावरील शेवटचे गर्डर हटवण्यासाठी पाचवी मार्गिका आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 9 च्या ट्रॅकवर (रेल्वे रूळ) शनिवार 11 मार्च 2023 रोजी रात्री साडेनऊ वाजल्यापासून रविवार 12 मार्च 2023 रोजी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक आहे. तसेच शनिवार 11 मार्च 2023 रोजी रात्री 12.10 ते रविवार 12 मार्च 2023 रोजी पहाटे 4.40 पर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 4 च्या अप धीम्या आणि अप-डाउन जलद मार्गांवर ब्लॉक आहे.

धीम्या (स्लो) आणि जलद (फास्ट) मार्गावरील ब्लॉकमुळे काही अप लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी गोरेगावच्या प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वरून विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

शनिवार 11 मार्च 2023 रोजी सुटणार असलेल्या रात्रीच्या शेवटच्या लोकल

  1. विरार ते चर्चगेट जलद लोकल (फास्ट लोकल) रात्री 11.15 वाजता विरार येथून सुटेल आणि चर्चगेटला मध्यरात्री 12 वाजून 42 मिनिटांनी पोहोचेल.
  2. वसई रोड ते अंधेरी धीमी लोकल (स्लो लोकल) रात्री 11.15 वाजता वसई रोड येथून सुटेल आणि अंधेरीला मध्यरात्री 12 वाजून 04 मिनिटांनी पोहोचेल.
  3. बोरिवली ते चर्चगेट धीमी लोकल (स्लो लोकल) रात्री 11.34 वाजता बोरिवली येथून सुटेल आणि चर्चगेटला मध्यरात्री 12 वाजून 39 मिनिटांनी पोहोचेल.

लांब पल्ल्यांच्या गाड्या

  1. 19038 बरौनी ते वांद्रे टर्मिनस अवध एक्स्प्रेस या गाडीचा प्रवास बोरिवली येथे संपेल (बोरिवली ते वांद्रे रद्द)
  2. 22946 ओखा ते मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल ही गाडी बोरिवली येथे 30 मिनिटे थांबवणार
  3. 22904 भूज ते वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एसी ही गाडी बोरिवली येथे 15 मिनिटे थांबवणार

अंधेरीतील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर दोन वेळा थांबणार (दुहेरी थांबा / डबल हॉल्ट)

22928 अहमदाबाद ते वांद्रे टर्मिनस लोकशक्ती एक्स्प्रेस, 19218 वेरावल ते वांद्रे सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस आणि 12928 एकता नगर ते दादर सुपरफास्ट या तीन एक्स्प्रेस अंधेरीतील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर दोन वेळा थांबणार. फलाटाची पुरेशी लांबी नसल्याने शनिवार 11 मार्च 2023 रोजी ही व्यवस्था करण्यात आली आहे. 

Womens Day : महिलांनी करून घ्याव्या या आरोग्य तपासण्या

लांबसडक सुंदर केसांसाठी खा हे पदार्थ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी