8 omicron cases in maharashtra महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 05, 2021 | 19:34 IST

8 omicron cases in maharashtra कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या 'ओमायक्रॉन'ची बाधा झालेले आठ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. यातील एक रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत तर एक रुग्ण पुण्यात आढळला. सहा रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळले. यामुळे देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधीत रुग्ण महाराष्ट्रात झाले आहेत. 

8 omicron cases in maharashtra
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे आठ रुग्ण
  • एक रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत तर एक रुग्ण पुण्यात
  • सहा रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळले

8 omicron cases in maharashtra मुंबईः कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या 'ओमायक्रॉन'ची बाधा झालेले आठ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. यातील एक रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत तर एक रुग्ण पुण्यात आढळला. सहा रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळले. यामुळे देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधीत रुग्ण महाराष्ट्रात झाले आहेत. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत ओमायक्रॉनबाधीत रुग्ण आढळल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी (रविवार ५ डिसेंबर २०२१) राज्यात आणखी सात ओमायक्रॉनबाधीत रुग्ण आढळले. यापैकी एक रुग्ण पुण्यात तर सहा रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळले.

नायजेरियातील लेगॉसमधून एक महिला तिच्या दोन मुलांसह पिंपरी चिंचवडमध्ये भावाकडे आली आहे. नायजेरियातून आलेल्या या तिघांना तसेच महिलेच्या भावाला आणि त्याच्या दोन्ही मुलींना 'ओमायक्रॉन'ची बाधा झाली. पुण्यात ४७ वर्षांच्या पुरुषालाही 'ओमायक्रॉन'ची बाधा झाली.

याआधी ल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत एक ओमायक्रॉनबाधीत आढळला आहे. तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईत आला. तरुणाला २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सौम्य ताप आला. अद्याप या तरुणात इतर कोणीतीही लक्षणे आढळली नाही. तरुणावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये मरिन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. रुग्णाचे वय ३३ वर्षे एवढे आहे. त्याने अद्याप कोरोना प्रतिबंधक लसचा एकही डोस घेतलेला नाही. 

भारतात आढळलेल्या ओमायक्रॉनबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर काहींच्या चाचण्यांचे अहवाल यायचे आहेत. विषाणूत बदल होणे ही नैसर्गिक बाब आहे. यामुळे घाबरून जाण्याऐवजी पात्र नागरिकांनी नियमानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे तसेच सर्वांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे; असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. 

आतापर्यंतच्या संशोधनानुसार, ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली त्यांच्यात आढळलेली कोरोनाची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असला तरी तो धोकादायक नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हा अगदी प्रारंभीचा निष्कर्ष आहे. तज्ज्ञ या विषाणूबाबत आणखी संशोधन करत आहेत. महिन्याभरात आणखी नेमकेपणाने याबाबतची माहिती हाती येईल. ओमायक्रॉन बाबत आणखी माहिती हाती येईपर्यंत लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्क घालणे, हात धुणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टंस राखणे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे हेच नागरिकांना शक्य आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी