Mumbai : मुंबईच्या तलावांमध्ये ९२.६२ टक्के पाणीसाठा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 08, 2022 | 11:51 IST

water storage in Mumbai : आतापर्यंत झालेल्या पावसानंतर मुंबईच्या तलावांमध्ये ९२.६२ टक्के पिण्यायोग्य पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

92.62 percent water storage in Mumbai seven reservoirs
Mumbai : मुंबईच्या तलावांमध्ये ९२.६२ टक्के पाणीसाठा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Mumbai : मुंबईच्या तलावांमध्ये ९२.६२ टक्के पाणीसाठा
  • पावसाळा संपण्यासाठी अद्याप दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक
  • मुंबईकरांची यंदाच्या वर्षीसाठीची पाण्याविषयीची चिंता संपली

water storage in Mumbai : आतापर्यंत झालेल्या पावसानंतर मुंबईच्या तलावांमध्ये ९२.६२ टक्के पिण्यायोग्य पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. मुंबईला सात तलावांमधून पाणी पुरवठा होतो. या सात तलावांमध्ये मिळून मुंबईकरांच्या आवश्यकतेसाठी ९२.६२ टक्के पिण्यायोग्य पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे मुंबईकरांची यंदाच्या वर्षीसाठीची पाण्याविषयीची चिंता संपली आहे. ( 92.62 percent water storage in Mumbai seven reservoirs )

पावसाळा संपण्यासाठी अद्याप दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. यामुळे मुंबईकर पाण्याबाबत निश्चिंत आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांची एकूण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी आहे. यापैकी १३ लाख ४० हजार ५०८ दशलक्ष लिटर पाणीसाठा तलावांमध्ये आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली. मागच्या वर्षी (२०२१) ८ ऑगस्ट पर्यंत मुंबईच्या सात तलावांमध्ये मिळून ७९.९५ टक्के पाणीसाठा होता. यंदा आधीच्या वर्षाच्या तुलनेत जास्त पाणीसाठा आहे. यामुळे मुंबईकर पाण्याच्या बाबतीत निश्चिंत आहेत. 

मुंबईला तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या सात तलावांमधून पाणी पुरवठा होतो. यापैकी तानसा तलाव आतापर्यंत ९९.५८ टक्के भरला आहे. मोडक सागर तलाव १०० टक्के भरला आहे. मध्य वैतरणा तलाव ९५.१६ टक्के तर अप्पर वैतरणा तलाव ८४.९५ टक्के भरला आहे. भातसा तलाव ९१.८६ टक्के तर विहार तलाव ८४.३० टक्के भरला आहे. तुळशी तलाव १०० टक्के भरला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिण्यायोग्य पाणीसाठ्याची स्थिती दिलासादायक आहे.

मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये किमान १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १३ लाख ४० हजार ५०८ दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणीसाठा आहे. पावसाळा संपण्यासाठी अद्याप दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. यामुळे मुंबईसाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा सहज उपलब्ध होईल असे चित्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी