नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 08, 2021 | 00:08 IST

वाढत्या कोरोना संकटामुळे महाराष्ट्र शासनाने मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन पुढल्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला.

9th and 11th Class students in Maharashtra state board promoted to the next class
नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास 

थोडं पण कामाचं

  • नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास
  • आधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा घेतला निर्णय
  • सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास

मुंबईः वाढत्या कोरोना संकटामुळे महाराष्ट्र शासनाने मोठा धोरणात्मक निर्णय घेतला. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन पुढल्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन पुढल्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. या निर्णयांमुळे सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे पहिली ते नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास होणार आहेत. 9th and 11th Class students in Maharashtra state board promoted to the next class

भारतात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे संकट मागच्या वर्षी (२०२०) धडकले. यामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत असलेल्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षाच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. काही दिवसांनी संकटाचे स्वरुप बघून नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतही असाच निर्णय झाला होता. यंदा महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात आधी पहिली ते आठवी नंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन पुढल्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. यामुळे परीक्षा दिली असो वा नसो महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षी पुढल्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाकरे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अनेक शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय झाला आहे. 

याआधी ऑनलाइन पद्धतीने शालेय शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. मात्र कोरोना रुग्ण वाढू लागल्यामुळे ताज्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मोठा निर्णय घेण्यात आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी