Ambedkar Jayanti 2022: बाबासाहेबांच्या १३१व्या जयंतीनिमित्त १३१ किलोचा केक कापला

मुंबई
Updated Apr 14, 2022 | 12:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ambedkar Jayanti 2022 । दरवर्षी १४ एप्रिल रोजी बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांची जयंती देशभरासह जगभरात साजरी केली जाते. बाबासाहेब हे देशाचे असे व्यक्तिमत्व होते ज्यांची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही.

A 131 kg cake was cut on the occasion of Babasaheb 131st birth anniversary
बाबासाहेबांच्या १३१व्या जयंतीनिमित्त १३१ किलोचा केक कापला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते.
  • बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
  • मुंबईतील भोईवाडा येथे बाबासाहेबांच्या १३१व्या जयंतीनिमित्त १३१ किलोचा केक कापला.

Ambedkar Jayanti 2022 । मुंबई : दरवर्षी १४ एप्रिल रोजी बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांची जयंती (Ambedkar Jayanti 2022) देशभरासह जगभरात साजरी केली जाते. बाबासाहेब हे देशाचे असे व्यक्तिमत्व होते ज्यांची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये त्यांनी वडिलांची भूमिका बजावली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सरकारने सरकारी सुट्टीही जाहीर केली आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. (A 131 kg cake was cut on the occasion of Babasaheb 131st birth anniversary). 

डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १३१ किलोचा केक कापला 

A 131 kg cake

मुंबईतील भोईवाडा येथे डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त १३१ किलोचा केक कापण्यात आला. यावेळी कॅबिनेट मंत्री वर्षा एकनाथ गायकवाड या देखील उपस्थित होत्या. 

पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली 

PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील संसद भवनाच्या लॉनवरील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुष्पहार अर्पण केला

President Ramnath Kovind

बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही संसद भवनात त्यांना आदरांजली वाहिली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूचींही उपस्थिती

vice president

संसद भवनाच्या लॉनमध्ये या वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूही उपस्थित होते. तसेच त्यांनी भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मायावतींनी बाबासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा 

BSP Chief Mayavati

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा सुप्रीमो मायावती यांनी लखनऊमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंसह बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली

cm uddhav Thackeray

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी दादर, मुंबई येथे आंबेडकर जयंती निमित्त डॉ. भीमराव आंबेडकर यांना पुष्पांजली वाहिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी