महाराष्ट्रातल्या मृतांचा आकडा 4वर, रुग्णांचा आकडाही वाढला

मुंबई
Updated Mar 26, 2020 | 12:14 IST

महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे.  महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. नवी मुंबईत 65 वर्षीय एका कोरोनाबाधित महिलेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत चौघां

Virus death update
महाराष्ट्रातल्या मृतांचा आकडा 4वर, रुग्णांचा आकडाही वाढला 

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे.  महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. नवी मुंबईत 65 वर्षीय एका कोरोनाबाधित महिलेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 122 वरून 130 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 23 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. 

नवी मुंबईतील वाशी खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.  पीडित महिला वाशी इथली रहिवासी होती. तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याने तिचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट २४ मार्चला आला होता. आज अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 122 वरुन 124 वर

आता  महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर गेली होती. मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून त्यांची केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे. दुसरा रुग्ण हा ठाण्यात सापडला आहे. 

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 • मुंबई – 51
 • पुणे – 19
 • पिंपरी चिंचवड – 12
 • सांगली – 9
 • कल्याण – 5
 • नवी मुंबई – 5
 • नागपूर – 4
 • यवतमाळ – 4
 • अहमदनगर – 3
 • ठाणे – 5
 • सातारा – 2
 • पनवेल – 1
 • उल्हासनगर – 1
 • वसई विरार – 1
 • औरंगाबाद – 1
 • रत्नागिरी – 1

एकूण 124


महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

 • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त
 • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
 • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
 • नागपूर (1) – 12 मार्च
 • पुणे (1) – 12 मार्च
 • पुणे (3) – 12 मार्च
 • ठाणे (1) – 12 मार्च
 • मुंबई (1) – 12 मार्च
 • नागपूर (2) – 13 मार्च
 • पुणे (1) – 13 मार्च
 • अहमदनगर (1) – 13 मार्च
 • मुंबई (1) – 13 मार्च
 • नागपूर (1) – 14 मार्च
 • यवतमाळ (2) – 14 मार्च
 • मुंबई (1) – 14 मार्च
 • वाशी (1) – 14 मार्च
 • पनवेल (1) – 14 मार्च
 • कल्याण (1) – 14 मार्च
 • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
 • औरंगाबाद (1) – 15 मार्च
 • पुणे (1) – 15 मार्च
 • मुंबई (3) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • यवतमाळ (1) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • मुंबई (1) – 17 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
 • पुणे (1) – 18 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
 • मुंबई (1) – 18 मार्च
 • रत्नागिरी (1) – 18 मार्च
 • मुंबई (1) – 19 मार्च
 • उल्हासनगर (1) – 19 मार्च
 • अहमदनगर (1) – 19 मार्च
 • मुंबई (2) – 20 मार्च
 • पुणे (1) – 20 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
 • पुणे (2) – 21 मार्च
 • मुंबई (8) – 21 मार्च
 • यवतमाळ (1) – 21 मार्च
 • कल्याण (1) – 21 मार्च
 • मुंबई (6) – 22 मार्च
 • पुणे (4) – 22 मार्च
 • मुंबई (14) – 23 मार्च
 • पुणे (1) – 23 मार्च
 • मुंबई (1) – 23 मार्च
 • कल्याण (1) – 23 मार्च
 • ठाणे (1) – 23 मार्च
 • सातारा (2) – 23 मार्च
 • सांगली (4) – 23 मार्च
 • पुणे (3) – 24 मार्च
 • अहमदनगर (1) – 24 मार्च
 • सांगली (5) – 25 मार्च
 • मुंबई (9) – 25 मार्च
 • ठाणे (1) – 25 मार्च
 • मुंबई (1) – 26 मार्च
 • ठाणे (1) – 26 मार्च
 • एकूण – 124 कोरोनाबाधित रुग्ण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...