Shivsena : इंदापूरमध्ये (Indapur) शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा (molestation) गुन्हा (crime) दाखल झाला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याप्रकरणी विशाल बोंद्रे (Vishal Bondre) यांनी गटबाजीतून हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप संबंधित महिलेवर केला आहे. जर 14 जुलै रोजी हा प्रकार झाला होता, तर ही महिला इतक्या दिवस शांत का बसली? असा देखील सवाल बोन्द्रे यांनी केला आहे. त्यामुळे इंदापूरमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.
विशाल बोंद्रे अस विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. विशाल बोंद्रे हे पुणे जिल्ह्याचे समन्वयक आहेत. परवा संध्याकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सचिन अहिर यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक झाली आणि काल विशाल बोन्द्रे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. इंदपूरमध्ये 14 जुलै रोजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.
Read Also : पटेलच्या वादळी अर्धशतकामुळे भारताचा विजय
ही बैठक संपल्यावर ग्रुप फोटो काढण्यासाठी उभे राहिले असता विशाल बोन्द्रे हे महिलेच्या पाठीमागे उभे राहिले आणि महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावरून महिलेने विशाल बोन्द्रे यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी विशाल बोन्द्रे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
Read Also : द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.