Mumbai police : छत्रपती संभाजीनगरनंतर आता मुंबईमध्ये 'हाय अलर्ट, 24 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश

Preventive Orders in Mumbai: श्रीरामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये येथे तयारीतून दोन गटात वाद झाला होता. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी २४ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

Mumbai police : छत्रपती संभाजीनगरनंतर आता मुंबईमध्ये 'हाय अलर्ट, 24 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश
A curfew has been ordered in Mumbai till April 24  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी
  • मुंबई शहरात जमावबंदीचे आदेश
  • शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

Preventive Orders in Mumbai : सध्याची महाराष्ट्र राज्यातील राजकीय स्थिती पाहता समाजात तेढ निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जमावबंदी लागू केली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत २४ एप्रिलपर्यंत जमावबंदी राहणार आहे. (A curfew has been ordered in Mumbai till April 24)

अधिक वाचा : Monsoon Update : कसा असेल यंदाचा पाऊसकाळ?, IMD ने वर्तवला असा अंदाज

श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांमध्ये राडा झाला होता. त्यामुळे राज्यभरात तणावजन्य निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नवा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे. तसेच मिरवणुका काढणे, सार्वजनिक निषेध, फटाके फोडणे आणि इतर काही 'अॅक्टिव्हीटीं'वर  बंदी घालण्यात आली आहे.

अधिक वाचा : Mumbai Megha block : मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवसांचा जंबो ब्लॉक, अनेक लोकल फेऱ्या रद्द

यामधून लग्न आणि अंत्यसंस्कार यासारख्या घरातील कार्यक्रमांना सूट देण्यात आली आहे. हा आदेश 10 एप्रिलपासून लागू झाला असून 24 एप्रिलपर्यंत तो लागू राहील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.  या आदेशाची मुदत संपल्यानंतरही कोणतीही चौकशी किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या बाबतीत दंड, शिक्षा होऊ शकते.

 या आदेशात विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, स्मशानभूमी-दफनभूमीवर लोकांनी एकत्र येणे, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांच्या बैठका यांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटगृहे, नाट्यगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी किंवा चित्रपट, नाटक किंवा कार्यक्रम पाहण्याच्या हेतूने लोकांना एकत्र येण्यास परवानगी आहे. यासह, शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा शैक्षणिक हेतूंसाठी संमेलने आणि कारखाने, दुकाने व आस्थापनांमध्ये व्यापार, व्यवसाय अशा गोष्टींसाठी परवानगी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी